कच्या हळदीचे हे फायदे जाणून आपले सुद्धा होश उडतील…आपले अनेक गंभीर रोग सुद्धा या हळदीच्या एका उपायाने होतील नाहीसे

कच्या हळदीचे हे फायदे जाणून आपले सुद्धा होश उडतील…आपले अनेक गंभीर रोग सुद्धा या हळदीच्या एका उपायाने होतील नाहीसे

थंडीच्या दिवसात आपल्याला बाजारात विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. या भाज्या केवळ चवीसाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. आपल्याला आल्यासारखी दिसणारी ही कच्ची हळद एक सुपर फूड म्हणून ओळखले जाते. आपल्या सर्वांना हळदीचे गुणधर्म माहित आहेत.

हळदीचा वापर जवळजवळ प्रत्येक भारतीय ताटात केला जातो. परंतु हिवाळ्यादरम्यान कच्ची हळद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कच्या हळदीमध्ये बऱ्याच प्रकारचे पोषक गुणधर्म असतात. त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर आपण सुद्धा त्याचे सेवन करण्यास सुरवात कराल.

हळद औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी सर्वात चांगला मसाल्याचा खजिना असल्याचे म्हटले जाते. हळद  सामान्यत: मसाल्याच्या रूपात आपल्या घरात वापरली जाते. पण थंडीच्या दिवसांत आढळणारी कच्ची हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

हळद पाचन तंत्र सुधारण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी वापरली जाते, त्यात आढळणारे घटक कार्कुमिनोइड्स आणि अशा प्रकारच्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीराला आलेली सूज किंवा एखादी दुखापत ठीक होण्यास मदत मिळते.

हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडेंट, अँटी- ट्यूमर, अँटी सेप्टिक, अँटी वायरल, कार्डियो प्रोटेक्टिव आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म आहेत. तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हळदीचे पाणी प्या. वजन घटण्यास नक्कीच मदत होईल.

वजन वाढीमुळे हृदय रोग, स्ट्रोक आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढत राहतो. पण योग्य प्रमाणात हळदीचे पाणी प्यायल्यास पोट आणि ओटी पोटावरील चरबी कमी होईल. यामध्ये असणाऱ्या कर्क्युमिन घटकामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.

चिंता, ताणतणावाची समस्या कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अँटी एंग्झायटी चे गुण आहेत. ज्यामुळे शारीरिक तसंच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. तसंच यातील अँटी-ऑक्सिडेंट चे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.

यकृताचे संरक्षण होते:-हळदीमुळे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. यकृत डिटॉक्स झाल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यकृताचे इनफेक्शनपासून संरक्षण झाल्यामुळे यकृत निरोगी राहण्यास मदत होते.

मधुमेहावर गुणकारी :-हळदीमधील अॅंटी इनफ्लेेमटरी आणि अॅंटी ऑक्सिडंट गुणांमुळे प्री-डायबेटीजच्या रूग्णांना टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका टाळता येतो. शिवाय यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची निर्मिती वाढण्यास मदत होते.

इन्शुलिनची निर्मिती योग्य प्रमाणात होऊ लागल्यास तुमच्या मधुमेहाच्या समस्येमधून तुम्हाला सुटका मिळू शकते. मात्र यासाठी वैद्यकीय उपचार करणे सोडू नये कारण प्रत्येकाच्या शरीरप्रकृतीनुसार उपचारांचा फरक जाणवत असतो. यासाठी हळदीच्या वापरासोबत वैद्यकीय उपचार आणि औषधेदेखील घेणे गरजेचे  आहे.

कच्च्या पोटी हळद पोटाच्या समस्यांसाठी देखील फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्याने पाचन तंत्र मजबूत होते आणि गॅस, अपचन आणि फुशारकी यासारख्या समस्यांपासून मुक्त होतो.

पचन क्रिया सुधारते:-पचनक्रिया बिघडली असल्यास कच्ची हळद फायदेशीर ठरते. कारण कच्ची हळद पचनक्रिया सुरळीत करते. कारण हळद पित्ताशयातील पित्ताच्या निर्मितीला उत्तेजन देते. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होते. हळदीच्या वापरामुळे पोटातील गॅस आणि आतड्यांची सूजदेखील कमी होण्यास फायदा होतो.

कच्ची हळद वापरल्याने शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते. व्हिटॅमिन बी in यामध्ये भरपूर प्रमाणात आढळते जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते:-हळदीमधील अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी व्हायरल आणि अॅंटी फंगल गुणधर्मांमुळे माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी रोज रात्री एक ग्लास कोमट दुधात एक चिमुट हळद टाकून ते प्या. ज्यामुळे तुम्हाला ताप,सर्दी, खोकला होणार नाही.

एवढेच नाही तर कच्ची हळद त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. एंटीसेप्टिक गुणधर्मांमुळे हळद पेस्ट लावण्यास सूचविले जाते. आपण फेस पॅकमध्ये चूर्ण हळदऐवजी कच्ची हळद वापरू शकता.

हळदीचा वापर कसा करावा : भारतीय स्वयंपाक घरात हळद ही असतेच. त्यामुळे तुम्ही अनेक खाद्यपदार्थांत हळद वापरू शकता. हळद एक औषधी गुणधर्म असलेला मसाला असल्यामुळे  तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या जेवणात दररोज हळद जाईल याची काळजी घ्या.

भाजी, सार, आमटी, वरण, स्मूदी, गरम दूध, सूप, सॅलेड, पुलाव, बिर्याणी अशा अनेक पदार्थांमध्ये तुम्ही हळदीचा वापर करू शकता. यासोबत दररोज सकाळी हळद टाकलेलं कोमट पाणी प्या ज्यामुळे तुमचे आरोग्य अगदी चांगले राहील.

admin