जर आपल्याला सुद्धा असेल डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास…तर त्वरित करा हे उपाय अन्यथा आपल्याला अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल

जर आपल्याला सुद्धा असेल डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास…तर त्वरित करा हे उपाय अन्यथा आपल्याला अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारिरक दुखण्यात कधी होते हे माणसाला कळतही नाही. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढू लागली आहे.

सतत होणारी ही डोकेदुखी अचानक मायग्रेनचं  रूप धारण करू लागली आहे. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते. यासाठी मायग्रेनच्या समस्या, लक्षणे आणि उपाय अवश्य वाचा.

मायग्रेन ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये तुमच्या डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणात दुखू लागतो. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो. एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते.

मायग्रेन ही एक न्युरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे. मायग्रेनमध्ये तुम्हाला मळमळ अथवा उलटीचा त्रासही होण्याची शक्यता असते. काही वेळा मायग्रेनमुळे तुमचे डोके जोरजोरात थडथडत आहे असे वाटू लागते. काही जणांचा रक्तदाबही यामुळे वाढू शकतो. मात्र काहीही असलं तरी या समस्येवर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे.

डॉक्टरांकडून तपासणी केल्यावरच तुमची डोकेदुखी मायग्रेनमुळे होणारी आहे का हे समजू शकतं. कारण प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन असेलच असे मुळीच नाही. शिवाय प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनच्या त्रासाचे कारण निरनिराळे असू शकते. मायग्रेन एक अनुवंशिक समस्या आहे.  मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

मायग्रेनचा त्रास होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा ही डोकेदुखी प्रखर उजेड, एखादा उग्र वास, चिंता-काळजी अथवा कर्णकर्कश आवाज यामुळे सुरू होऊ शकते. मात्र या व्यतिरिक्त अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचं डोकं दुखू शकतं

उच्च रक्तदा , अपूरी झोप, ताण-तणाव,अधिक प्रमाणात पेनकिलर घेणं,हॉर्मोन्समधील बदल,सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे

जर आपल्याला नेहमीच डोकेदुखी असेल तर आपण ते तपासावे. रक्तदाब वाढल्याने वारंवार डोकेदुखी होते आणि कमी रक्तदाबमुळे मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे डोकेदुखी होते, अशा परिस्थितीत आपण आपला रक्तदाब प्रथम तपासला पाहिजे. चला तर मग यावर आपण काही घरगुती उपाय जाणून घेऊ.

एक्यूप्रेशर:-जुन्या काळापासून लोक डोकेदुखीच्या मुक्तीसाठी एक्यूप्रेशर वापरत आहेत, डोकेदुखी झाल्यास आपण दोन्ही तळवे समोर आणा. यानंतर, हाताच्या अंगठा आणि हाताच्या बोटाच्या दरम्यान हलक्या हाताने मालिश केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळेल.

पानी:-दररोज कमीत कमी 12-15 ग्लास पाणी प्या. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. तसेच रेशी झोप घ्या. झोपमोड होणार नाही याची दक्षता घ्या. यासाठी झोपण्यापूर्वीच आजूबाजूचे वातावरण शांत
ठेवण्यासाठी घरच्यांना विनंती करा.

गरम लवंग:-डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

तुळशीच्या पानांनी;-आपण बर्‍याचदा पाहिलेच असेल की लोक डोकेदुखीमध्ये चहा किंवा कॉफी पितात, पण जर त्यात आपण तुळशीची पाने घालून त्याचे सेवन केले तर आपल्याला त्याचा अधिक फायदा होतो.

आले – एक चमचा आल्याच्या रसात थोडं मध मिसळा. हे मिश्रण पाण्यात मिसळा आणि प्या. ज्यामुळे तुमची डोकेदुखी कमी होईल. त्यासोबतच आल्याचा चहा घेतल्यास अथवा आल्याचा एक तुकडा तोंडात ठेवल्यासदेखील तुम्हाला आराम मिळू शकेल. आल्याचा रस पोटात गेल्याने तुमची डोकेदुखी कमी होऊ शकेल.

दालचिनी – दालचिनी पावडर हा मसाल्याचा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे तुमचं जेवण तर स्वादिष्ट होतच शिवाय तुम्हाला मायग्रेनपासूनदेखील सुटका मिळू शकते. यासाठी दालचिनी पावडर पाण्यात मिसळून तुमच्या कपाळावर लावा. तुम्हाला निवांत वाटू लागेल.

स्ट्रेच करून पहा: अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डोकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करुन व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही याची काळजी घ्यावी.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *