आणि एका रिक्षाचालकाची मुलगी बनली ‘मिस इंडिया’….एका मुलीने केले आपल्या बापाचे या प्रकारे स्वप्न पूर्ण…एक मुलगी आपल्या बापासाठी काय करू शकते पहा

आणि एका रिक्षाचालकाची मुलगी बनली ‘मिस इंडिया’….एका मुलीने केले आपल्या बापाचे या प्रकारे स्वप्न पूर्ण…एक मुलगी आपल्या बापासाठी काय करू शकते पहा

स्वप्नांना मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाचं बळ मिळालं की ते खरे होतात. मग तुमची किंवा तुमच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी काय आहे, हे नगण्य ठरतं. उत्तरप्रदेशमधल्या एका रिक्षाचालकाच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ‘मिस इंडिया २०२०’च्या उपविजेतीपर्यंत मजल गाठली.

वीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२० च्या विजेत्यांची नावं नुकतीच समोर आली. यामध्ये तेलंगणाच्या मानसा वाराणसीने ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला.

तर उत्तर प्रदेशच्या मान्या सिंहने या सौंदर्यस्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलं. मान्याने घेतलेली मेहनत आणि तिचा इथपर्यंतचा खडतर प्रवास सध्या अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरतोय. या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतलेल्या इतर स्पर्धकांपेक्षा मान्याचं बालपण आणि त्यापुढील आयुष्य फार वेगळं आणि संघर्षपूर्ण आहे. मान्याचे वडील रिक्षाचालक असून यशापर्यंतचा तिचा प्रवास इतरांपेक्षा अधिक कठीण होता.

  

‘फेमिना मिस इंडिया 2020’ ची रनर अप मान्या सिंह हिचा इथवरच प्रवास सोपा नव्हता. तिच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. मान्या सिंह उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधील आहे,

मात्र मुंबईत लहानाची मोठी झाली. मान्याचे वडील मुंबईत रिक्षाचालक आहेत आणि जेव्हा मान्या लहान होती तेव्हा घरात दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत होता. अशा परिस्थितीत मान्याला घरात अनेकदा इतर सदस्यांप्रमाणे उपाशी झोपावं लागत होतं.

‘फेमिना मिस इंडिया 2020’ ची रनर अप बनल्यानंतर, मान्या सिंहने एबीपी न्यूजशी खास संवाद साधला. त्यात तिने सांगितले की, मी वयाच्या 14 व्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली. मी ‘पिझ्झा हट’ मध्ये काम करत होते आणि मी लोकांची भांडी देखील घासली आहेत. माझ्या आयुष्यात मी लोकांची बुट देखील पॉलिश केले आहेत, असं मान्याने सांगितलं.

मान्याने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत सुधार व्हावा यासाठी कॉल सेंटरमध्येही काम केले. मान्या सांगते, मी कॉलेजला असताना विचार करायची की माझ्या आई-वडिलांना असं वाटायला नको की घरात एखादा मोठा मुलगा असयला हवा होता, ज्याने दोन पैसे कमावले असते. मान्याला एक छोटा भाऊ आहे जो सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

मान्याचे वडील मोठ्या अडचणीतून घराचा गाडा हाकत होते. अशा परिस्थितीत आई-वडिलांकडे मान्याच्या शालेय शिक्षणासाठी देखील पैसे नव्हते. माझ्या पालकांनी माझ्या शाळेत हात जोडून सांगितले होते की,

आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी ते पैसे देऊ शकत नाहीत. पण तिला शाळेत शिक्षण घेण्याची परवानगी देण्यात यावी. दरवर्षी ते फक्त परीक्षा शुल्क देत होते. अशा परिस्थितीत मी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजची फी भरण्यासाठी आईने तिची चांदीची साखळी देखील विकली होती, असं मान्याने सांगितलं.


कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा हेतू फक्त पैसे मिळवून घर चालवणे नव्हता, तर सौंदर्य स्पर्धेचाही एक भाग होता. मान्याने सांगितलं की, कॉल सेंटरमध्ये काम करत असताना मला कसे बोलायचे हे.

शिकण्याची इच्छा होती. माझी जीवनशैली मला सुधारायची होती आणि माझा आत्मविश्वास वाढवायचा होता. घरातील खराब वातावरणामुळे एकदा मान्या गोरखपूरहून ट्रेनमध्ये एकटी आली होती. या तीन दिवसांच्या प्रवासात मान्याकडे पैसे नव्हते म्हणून ती उपाशीच होती. असा मान्याचा खडतर प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *