अमिताभ बच्चन यांची भाची नैनाने केले होते असे लपूनछपून लग्न …यामुळे बच्चन कुटंबीयांना …

अमिताभ बच्चन यांची भाची नैनाने केले होते असे लपूनछपून लग्न …यामुळे बच्चन कुटंबीयांना …

अमिताभ बच्चन यांची भाची नैना बच्चन यांच्याबद्दल फारच थोड्या लोकांना माहीत आहे. नैना अमिताभचा भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे. अजिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी रमोला बच्चन मीडियाच्या चमक धमक पासून दूर राहणे पसंत करतात त्यांना 4 मुले आहेत. एक मुलगा भीमा जो एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे आणि तीन मुलींची नावे आहेत नीलिमा नम्रता आणि नैना. नैना व्यवसायाने एक इन्वेस्टमेंट बैंकर आहे. तिने फेब्रुवारी 2015 मध्ये बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरशी लग्न केले आहे. हे लग्न अत्यंत गुप्त पद्धतीने करण्यात आले होते. या दोघांची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे.कुणालने 2007 मध्ये लगा चुनरी में डाग हा चित्रपट केला होता. यावेळी अभिषेक बच्चनशी त्याची मैत्री झाली. त्यामुळे बच्चन कुटूंबियांशी  भेट होत रहायची. यानंतर कुणाल आणि नैनाची पहिली भेट २०१२ मध्ये अमिताभ बच्चन यांची मोठी मुलगी श्वेता बच्चन यांच्यामुळे झाली होती. श्वेताने करण जोहरच्या एका फॅशन शोमध्ये या दोघांची ओळख करून दिली होती. तेव्हा कुणाल रॅम्पवर चालत होता व नैना त्याला दर्शक म्हणून पहात होती.

जेव्हा नैनाने कुणालला पाहिले तेव्हा ती पहिल्यांदाच प्रेमात पडला. ती म्हणते की कुणालला पाहिल्यानंतर माझ्या मनात आले होते की – व्वा उंच गोरा आणि देखणा .. आणि त्याच वेळी कुणालचा प्रेमात पडले. नैना म्हणते की कुणाल तिच्या लग्नाआधी जसा होता अगदी आज सुद्धा तो तसाच आहे.

नैनालाही कुणालचे चित्रपट खूप आवडत होते. तिने कुणालचे चित्रपट पाहिल्यावर ती लगेच इंप्रेस झाली. एकदा कुणालसोबत डेटवर जात असताना नैनाने त्याच्यासाठी पियानो वाजवले होते. कुणाल नैनाच्या या स्टाईलने प्रभावित झाला होता. आणि एक प्रकारे कुणालही पहिल्यांच भेटी मध्ये नैनाच्या प्रेमात पडला. या दोघांनी लग्नापूर्वी दोन वर्षे एकमेकांना डेट केले आणि हे दोघेही लिव्ह-इनमध्ये एकत्र राहत होते. नैना आणि कुणाल यांनी त्यांचे लग्न अतिशय सीक्रेट ठेवले होते. या लग्नात केवळ त्याचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या लग्नाची माहीती माध्यमांना सुद्धा नव्हती. सध्या दोघेही एकमेकांसोबत अत्यंत आनंदी आहेत. या दोघांची जोडी अप्रतिम दिसते. कुणाल अभिनयाबरोबरच नैनाच्या व्यवसायातही मदत करत असतो. तसे आपल्याला त्यांची जोडी कशी वाटली.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *