नीता आंबानी यांचापेक्षा खूपच वेगळ्या आहेत अनिल आंबानी यांच्या पत्नी …बघा का आहेत त्या एकदम वेगळ्या

नीता आंबानी यांचापेक्षा खूपच वेगळ्या आहेत अनिल आंबानी यांच्या पत्नी …बघा का आहेत त्या एकदम वेगळ्या

अंबानी कुटुंब हे जगातील चौथे आणि भारतातील एक नंबरचे श्रीमंत कुटुंब आहे. नीता आणि टीना अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील सूना आहेत. नीता अंबानी ह्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी असून टीना मुनीम ह्या अनिल अंबानी यांच्या पत्नी आहेत.

या दृष्टीने नीता अंबानी आणि टीना अंबानी या एकमेकांच्या जावा आहेत. हे श्रीमंत कुटुंब पाहून प्रत्येकाच्या मनात येत असेल की आपण या कुटुंबाचा एक भाग असतो तर खूप बरं झालं असत. परंतु या  कुटुंबातील दोन सूनानमध्ये बरेच फरक आहेत. नीता आणि टीना यांच्या मध्ये काय काय फरक आहेत ते आपण पाहू.

कौटुंबिक पार्श्वभूमीत फरक:-

निता अंबानीचा जन्म मुंबईत झाला होता. त्याचे वडील नोकरी करायचे. नीता अंबानी मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या  आणि लग्नाआधी त्या शाळेत शिक्षिका होत्या. मुकेश अंबानीशी लग्न करण्यापूर्वीच त्यांनी अध्यापन बंद करणार नाही अशी अट ठेवली होती. दुसरीकडे, टीना मुनिम यांचा जन्म गुजरातमधील एक श्रीमंत अशा जैन कुटुंबात झाला होता. टीनाला नेहमीच मॉडेलिंग मध्ये नाव बनवायचे होते आणि ते तसे घडले सुद्धा. अनिल अंबानी यांचा लग्नापूर्वी ती बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. कर्ज या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळाला होता.

लूक्समध्ये फरक:-

लग्नानंतर या दोघीचे लुकही लक्षणीय बदलले. लग्नाच्या वेळी नीता अगदी साधी आणि बारीक होती. तरी लग्नानंतर त्यांनी केवळ आपल्या फिटनेस कडे लक्ष दिलेच शिवाय त्या नेहमीपेक्षा अधिक मोहक दिसत आहेत. पूर्वीपेक्षा त्याच्या लूक्समध्ये खूपच बदल झाला आहे.

दुसरीकडे, टीना लग्नापूर्वी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती, अशा परिस्थितीत ती सुंदर तर होतीच.पण लग्नानंतर टीनाने बरेच वजन वाढवले ​​आणि तिचा चेहरादेखील खूप बदलला आहे. त्याना पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही की त्या एकेकाळी चित्रपटाच्या नायिका होत्या.

ड्रेसिंग सेन्समध्येही फरक:-

नीता अंबानी आणि टीना अंबानी यांचा ड्रेसिंग सेन्सही बराच वेगळा आहे नीता अंबानी या पारंपारिक लुकमध्ये तसेच ग्लॅमरस लूकमध्येही दिसतात साडी आणि सूट व्यतिरिक्त नीता जीन्स, टी-शर्ट, मिडी आणि वन पीस मध्ये सुद्धा दिसल्या आहेत. त्याचवेळी टीना या बऱ्याच वेळी सलवार आणि सूटमध्ये दिसतात. नीता अंबानी अनेकदा स्टायलिश कपड्यांमध्ये सुद्धा दिसतात. पण टीना अनेकदा त्यांचा वाढलेल्या वजनामुळे पारंपारिक कपड्यांमध्ये दिसतात.

शौक:-

नीता यांना नेहमीच नृत्यात रस असतो. त्या देखील भरतनाट्यम डान्सर आहेत. नृत्याव्यतिरिक्त त्यांना पोहणे आणि पुस्तक वाचनाची ही आवड आहे. क्रिकेट हा त्याचा आवडता खेळ आहे. एवढेच नव्हे तर नीता या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सची मालकीण सुद्धा आहे. दुसरीकडे टीना मुनिम या चित्रकला जगाशी सं-बंधित आहेत. त्या गेल्या सतरा वर्षांपासून हॉरमनी आर्ट शो आयोजित करत आहेत. त्यांच्या हॉरमनी आर्ट फाउंडेशनने अनेक चित्रकारांचे नेतृत्व केले. याशिवाय टीना हॉस्पिटल आणि चॅरिटीमध्येही बराच वेळ खर्च करतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *