अति प्रमाणत चहाचे आणि कॉफीचे सेवन करता आहे…तर त्वरित सावध व्हा अन्यथा अनेक समस्यांना द्यावे लागेल तोंड…जाणून घ्या किती प्रमाणत

अति प्रमाणत चहाचे आणि कॉफीचे सेवन करता आहे…तर त्वरित सावध व्हा अन्यथा अनेक समस्यांना द्यावे लागेल तोंड…जाणून घ्या किती प्रमाणत

जगभरातील अनेक लोक दररोज चहा-कॉफीचं सेवन करतात. चहा कॉफी सध्या अनेकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. त्यांची सकाळ चहा आणि कॉफी पासूनच सुरु होते. त्यांना चहा आणि कॉफीची सवय झालेली असते.

त्याचप्रमाणे अनेक लोक बियर, वाईन, दारुचं दररोज सेवन करतात. दारु शरीरासाठी हानिकारक आहे, असं नेहमी म्हटलं जातं. मात्र, त्याचं सेवन नियंत्रणात केलं तर त्याचेदेखील फायदे असल्याचं काही संशोधनांमध्ये समोर आलं आहे. मात्र, त्याची सवय किंवा वेसन असणं चुकीचं आहे. या पदार्थांचे नेमके काय फायदे आणि तोटे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

चहा आणि कॉफीची महत्त्वाची समस्या म्हणजे या दोन्ही पेयांमध्ये साखर असते. कॅपेचिनोसारख्या कॉफीमध्ये क्रीमही असते. त्यामुळे सतत चहा- कॉफी पिणाऱ्यांच्या पोटात कॅलरीजदेखील जास्त जातात.

या अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. हा मुद्दा लक्षात घेतला तर चहा- कॉफी दोन्हीही कमी साखरेचे किंवा साखर न घातलेले घ्यावे. शक्यतो त्यात दूधही न घातलेले चांगले. दूध न घालण्याचे कारणही समजून घेणे गरजेचे आहे. दुधात ‘केसिन’ नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन चहा- कॉफीतील अँटिऑक्सिडंटस्चा प्रभाव कमी करते.

चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य म्हणजे:-जगभरात कॅफिनचा वापर केला जातो. कॅफिनमुळे आपल्या मेंदूला ताजेतवाने वाटते त्यामुळे कामाची क्षमता वाढते. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. कॅफिन आपल्या शरीराच्या श्‍वासोच्छ्वासात आराम देते. पण कॅफिन हे उत्तेजना आणणारे पेय असल्याने ताजेतवाने वाटत असते.

कॉफीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होत असतो

कॅफिनचा झोपेवर वाईट परिणाम होतो. गर्भवती महिलांना आणि ज्यांना लहान बाळ आहे त्या महिलांनीही कॉफीचे सेवन अधिक प्रमाणात करू नये. दिवसभरात केवळ 200 मिलिग्राम पेक्षा अधिक कॉफीचे सेवन करू नये. गर्भवती महिलांनी जास्त कॅफिनचे सेवन केल्यास त्याचा परिणाम गर्भातील बाळाच्या विकासावर प्रभाव टाकणारा ठरवू शकतो.

किती प्यावी कॉफी

कॅफिन किती प्रमाणात सेवन केले पाहिजे हे समजून घेताना केवळ कॉफीच नाही तर चहाच्या सवयीवरही लगाम लावला पाहिजे. ब्लॅक टी मध्ये प्रति कप 47 ते 60 मिलिग्रॅम कॅफिन असते. ग्रीन टी मध्ये 25 मिग्रॅ, इतर एनर्जी ड्रिंक्स मध्ये 80-100 मिग्रॅ आणि सोड्याच्या एका कॅनमध्ये 40 -50 मिग्रॅ कॅफिन होते.

कॉफीचे तोटे

जास्त कॉफी प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होते. त्यासाठी एक कप कॉफी प्यायल्यानंतर काही वेळानंतर दोन कप पाणी प्यायला हवे. प्रतिदिन आठ ते दहा ग्लास पाणी प्रत्येक व्यक्‍तीने प्यायला हवे.

कॉफीमुळे ऊर्जा मिळत नाही, पण व्यक्‍ती सजग होते. अर्थात अशी ऊर्जा मिळवणे हा कायमस्वरूपी मार्ग निश्‍चितच नाही. अशी ऊर्जा किंवा उत्साह मिळवण्यापेक्षा रक्‍तातील साखरेची पातळी योग्य राखण्यासाठी दर दोन तासांने आरोग्यकारी पदार्थांचे सेवन करावे. दिवसभरात एक कप कॉफी देखील पुरशी ठरू शकते.

चहाचा एक घुट घेतला तरी अख्ख दिवस ताजतवान वाटत. मघ ते घरी बनवली चहा असो किंवा बाहेरची टपरीवर ची असो. कित्येक लोकांना दिवसातून ४ ते ५ वेळा चहा पिण्याचे सवय असते. पण फ्रेश करणारी ही चहा आपल्या आरोग्यासाठी तेवढीच हानिकारक आहे.

दिवसाला ५ ते १० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.

भारतीयांचे चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, रक्तदाब वाने, पक्षाघातासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीराला मारक बनतो. म्हणून चहाचे प्रमाण जेवढे कमी कराल तेवढेच तुमचे आरोग्य चांगले राहील.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *