जर आपण पण करत असाल ऑनलाइन शॉपिंग तर या गोष्टीकडे प्रथम लक्ष द्या…अन्यथा पडू शकतो हजारो रुपयांचा गंडा.

जर आपण पण करत असाल ऑनलाइन शॉपिंग तर या गोष्टीकडे प्रथम लक्ष द्या…अन्यथा पडू शकतो हजारो रुपयांचा गंडा.

आजच्या काळात ऑनलाइन शॉपिंगबाबत लोकांमध्ये क्रेझ मोठी आहे. कारण त्यामध्ये आपला वेळ वाचतो, दुसरे म्हणजे बर्‍याच वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जाऊन आपण बर्‍याच ब्रँड्स आणि आकर्षक ऑफर्सचा फायदा घेऊ शकतो, परंतु ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे, अन्यथा आपल्यासाठी ही समस्या बनते.

शॉपिंग साइटवर वस्तू खरेदी करताना, साइट विश्वसनीय असल्याचे निश्चित करा - एक प्रतीकात्मक चित्र

तुम्ही ज्या वस्तूची खरेदी करतायत, तर त्या वस्तूला वॉरंटी नेमकी मॅन्यूफॅक्चरची आहे की रिटेलरची, ते नीट पाहा.
रिटेलरने ठेवली असेल, तर अत्यंत सावधानता ठेवा, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर सहसा टाळलेलं बरं, कारण याची वॉरंटी फारच कमी असते. प्रत्यक्षात संबंधित कंपनीने विक्रीस ठेवली असल्यास त्याची विश्वासार्हता अधिक असते.

जेव्हा आपण एखाद्या उत्पादनास ऑर्डर देत असाल तर केवळ त्याची समाप्ती तारीख काय आहे ते तपासा - सूचक चित्र

स्टार पाहताना हे लक्षात घ्या, या रिटेलरने किती वस्तू विकल्या आहेत, चार-पाच वस्तू विकून रिटेलरला अधिक चांगले स्टार मिळतात. मात्र खूप मोठ्या प्रमाणात वस्तू विक्री केल्यानंतर ज्या रिटेलर्सला चांगले स्टार आहेत, त्यांच्या वस्तू घेण्यास हरकत नाही. म्हणजे ५०० वस्तू विकून एखादी तक्रार असेल तर ठिक असू शकते.

संबंधित वस्तू रिटेलरने किंवा प्रत्यक्षात संबंधित कंपनीने म्हणजेच मॅन्यूफॅक्चर विक्रीस ठेवली आहे का? हे प्रत्येक ऑनलाईन वेबसाईटवर वस्तूची माहिती देताना नमूद केलेले असते.

ऑफर पाहिल्यानंतर वस्तू खरेदी करण्यास घाई करू नका - सूचक चित्र

वस्तूची ‘रिटर्न पॉलिसी’ तपासून घ्या:-

प्रथम वस्तूंची रिटर्न पॉलिसी हा महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काही पॉलिसीज फसव्या असतात. तर कधी रिटर्नसाठी ‘नियम आणि अटी’ लागू असतात. म्हणजेच एक मोठी किंतु परंतु यादी तयार असते.

ती न वाचताच आपण जर वस्तू खरेदी केली आणि ती परत पाठवायची झाल्यास लीगल रिटर्न पॉलिसीच्या टर्म्समुळे आपल्याला अडथळा येऊ शकतो. त्यासाठी ती यादी नीट वाचून घेणे आवश्यक असते. नाहीतर आपली फसगत नक्की.

उत्पादनास ऑर्डर देताना त्याच्या सर्व अटी व शर्तींकडे लक्ष द्या

स्वतःबद्दल कमीत कमी माहिती इंटरनेटवर द्या:-

वेबसाईटवर खाजगी माहिती गोळा करण्यासाठी एखादी प्रश्नमंजुषा होत असेल तर सावधान व्हा इथे नक्कीच काहीतरी काळंबेरं असतंच. कारण कोणतीही बँक आपल्याला खाजगी माहितीचे किंवा पासवर्ड्सचे मेसेज, पॉप-अप देत नाही. त्यामुळे जेव्हा अशी माहिती गोळा केली जाते तेव्हा त्याचा उपयोग फ्रॉड करण्यासाठीच केला जातो. म्हणून कुठेही आपली माहिती देऊ नका.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *