मोहरीच्या तेलामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म….जर आपल्याला सुद्धा आयुष्यभर निरोगी राहायचे असेल…तर आजच करा प्रकारे या तेलाचा वापर.

मोहरीच्या तेलामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म….जर आपल्याला सुद्धा आयुष्यभर निरोगी राहायचे असेल…तर आजच करा प्रकारे या तेलाचा वापर.

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आज आम्ही आपल्याला  मोहरीच्या तेलाचे फायदे सांगणार आहोत. मोहरीचे तेल साधारणपणे प्रत्येक घरात वापरले जाते. मोहरीच्या तेलामध्ये अनेक औषधी गुण आहेत, जे शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत.

पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. पण जर आपण मोहरीचे तेल वापरले तर बर्‍याच रोगांपासून बचाव करता येतो. चला तर मग मोहरीच्या तेलाचे फायदे जाणून घेऊया…

मोहरीच्या तेलाचा उपयोग त्वचेची प्रतिकारशक्ती वाढवते - सूचक चित्र

कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांनी आंघोळ करण्यापूर्वी मोहरीच्या तेलानं मसाज करावा. हा उपाय जवळपास महिनाभर करून पाहावा.

कोरड्या त्वचेची समस्या कमी होऊ लागल्यास आठवड्यातून दोन वेळा या तेलाने शरीराचा मसाज करावा. मोहरीच्या तेलामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते.

हिवाळा- सर्दीपासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या नाकात मोहरीचे तेल लावा - सूचक चित्र

बाजारातील केमिकलयुक्त सनस्क्रीन लावण्यापेक्षा मोहरीचे तेल वापरुन पाहा. हे तेल त्वचेवर एका नैसर्गिक सनस्क्रीन प्रमाणे काम करते.

योग्य प्रकारे या तेलाचा वापर केल्यास सन टॅनची समस्या कमी होण्यास मदत मिळेल आणि त्वचेवर चमक देखील येईल. महत्त्वाचे म्हणजे त्वचा निरोगी राहील. घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचे काही थेंब त्वचेवर लावा. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होईल.

तसेच मोहरीच्या तेलामुळे केस लांबसडक, घनदाट आणि काळेशार होण्यास मदत मिळेल. मोहरीचे तेल कोमट करून घ्या आणि हलक्या हाताने मुळांपासून केसांचा चांगल्या पद्धतीने मसाज करा.

यानंतर तासभर केसांमध्ये तेल राहू द्यावे. थोड्या वेळाने हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. यामुळे कोंडा, टाळूला खाज सुटणे आणि केसगळती यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

मोहरीच्या तेलाने - शरीरावर मालिश करून बुरशीजन्य संसर्ग टाळता येतो - सूचक चित्र

जखम झाल्यास:-

याशिवाय आपल्या शरीरावर जखम झाल्यास आणि ती बराच काळ ठीक न झाल्यास मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरेल. त्यामुळे जखमेवर मोहरीचे तेल नियमित लावा. जखम सुकून बरी होईपर्यंत तेल लावण्यात सातत्य असावे.

ओठांवर मोहरीचे तेल लावल्याने ओठ फोडण्याची समस्या दूर होते - सूचक चित्र

तुमची त्वचा निस्तेज आणि काळपट दिसत आहे का? तर बेसन, लिंबू रस आणि अर्धा चमचा मोहरीचे तेल एका वाटीमध्ये घ्या आणि त्याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय नियमित केल्यास चेहरा चमकदार होईल आणि काळवंडलेल्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

तसेच थंडीमध्ये ओठ फाटण्याच्या समस्येमुळे बहुतांश जण त्रस्त असतात. ही समस्या अतिशय त्रासदायक असते. फाटलेल्या ओठांवर बाजारातील क्रीम लावण्यापेक्षा मोहरीचे तेल लावा.

नैसर्गिक उपचारामुळे तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या ओठांवर मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब लावा. यामुळे ओठ मऊ राहण्यास मदत मिळेल. ओठांसाठी केमिकलयुक्त क्रीमचा वापर करणं टाळावे. कारण ओठांच्या नैसर्गिक गुलाबी रंगावर दुष्परिणाम होऊन ते काळे पडतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *