जाणून घ्या का असते पेनांच्या टोपणाला लहान छिद्र…बघा गंमतीशीर अशी यामागील गोष्ट…आपल्याला सुद्धा आश्यर्य वाटेल

जाणून घ्या का असते पेनांच्या टोपणाला लहान छिद्र…बघा गंमतीशीर अशी यामागील गोष्ट…आपल्याला सुद्धा आश्यर्य वाटेल

जरी हे युग डिजिटल झाले असले तरीही पेनचा वापर अद्याप कमी झालेला नाही. पेन एकेकाळी फॅशन म्हणून ओळखला जात होता. अनेक लोक त्यांच्या शर्टच्या खिशात घालून लोक चालत असत. आपल्या खिशाला पेन लावल्याशिवाय आपला दिवसच सुरु होत नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.

असा हा पेन दिसायला जरी लहान असला तरी त्याचे फायदे आपल्याला खूप आहेत. कधी गरज पडली आणि हा पेन जवळ नसला तर आपलं काम रखडलंच समजा. पण फारच कमी लोकांनी या पेनकडे बारकाईने पाहिलं असेल. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना पेन कॅपच्या टोकाला एक लहानसं छिद्र नक्कीच आढळलं असेल आणि त्याच वेळी आपल्या मनात प्रश्न उद्भवला असेल कि असं का बरं?

आपल्या वडीधा-यांना किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांना लहानपणी पेन वापरताना पाहिले आहे. आपणही यानंतर बॉलपेनचा वापर करण्यास सुरुवात केली आणि आपण या पेनचा वापर करत मोठेही झालो. पण पेनाला लहान छिद्र का असते हे आपल्यापैकी कदाचित काही लोकांनाच माहित असेल.

पेनाचे टोपण:-

pen

काही लोकांच्या मते, पेन बंद स्थितीत असताना या छिद्रांमुळे हवेचा बाहेरील दाब व शाईवरील दाब यांमध्ये समतोल राखला जातो. उन्हाळ्यात वा बंदिस्त जागी पेन टोपणाला छिद्रे नसल्यास ठेवले असता तापमान वाढून टोपणात शाई उतरते. पण या छिद्रामागचे खरे कारण काही वेगळेच आहे. यावर अनेकांची उत्तरे असतील की पेनाची शाई सुकू नये म्हणून झाकणावर होल असतो. मात्र हे खरे कारण नाहीये.

काय आहे मूळ कारण:-

pens

विशेषत: लहान मुलांना – पेन कॅप तोंडात घालण्याची सवय असते. जर कॅप चुकून तोंडात गेली आणि अडकली तर त्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होऊन जीव देखील जाऊ शकतो आणि पेन कॅपच्या टोकाला छिद्र नसल्यास त्यातून हवा जाण्याचा मार्ग देखील बंद होऊ शकतो.

म्हणजे समजा कोणीही चुकून जरी पेनची कॅप गिळाली तर पेन कॅपच्या टोकाला छिद्र असल्यामुळे त्यातून हवा पास होईल आणि त्याला श्वासोच्छवास घेण्यात जास्त अडथळा होणार नाही. त्याच्या जीवाला असलेला धोका देखील भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणून पेन कॅपच्या टोकाला छिद्र असतं.

यामागील वैज्ञानिक कारण:-

blue pen

पेनच्या झाकणाला होल असते कारण जेणेकरून झाकण बंद होते तेव्हा कार्बन डाय ऑक्साईडच्या दबावामुळे शाई बाहेर पडत नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *