या लोकांनी चुकून सुद्धा करू नये हळदीचे सेवन…मुतखडा असणाऱ्या लोकांनी तर खास लांब राहावे…अन्यथा बहुउपयोगी हळद आपल्या जीवावर बेतू शकते

या लोकांनी चुकून सुद्धा करू नये हळदीचे सेवन…मुतखडा असणाऱ्या लोकांनी तर खास लांब राहावे…अन्यथा बहुउपयोगी हळद आपल्या जीवावर बेतू शकते

हळद हा प्रत्येकाच्या घरात अगदी सहज सापडणारा आरोग्यदायी पदार्थ म्हणून ओळखला जातो. आयुर्वेदात सुद्धा हळदीला खूप महत्त्व आहे. रोजच्या वापरात सुद्धा हळद खूप कामी येते.

काही जखम झाली असेल तर रक्त रोखून धरण्याचे काम हळद करते. शिवाय रोज हळद युक्त आहार घेतल्याने शरीराला सुद्धा खूप फायदे होतात. पण तुम्हाला माहित असेलच की कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. तिचे जर एका बाजूला फायदे असतील तरी दुस-या बाजूला तोटे सुद्धा नक्कीच असतात.

जगातील सर्व गोष्टींप्रमाणे ही गोष्ट हळदीला सुद्धा लागू होते. हो मंडळी तुम्ही आजवर केवळ हळदीचे फायदे पाहिले, पण हळदीचे दुष्परिणाम सुद्धा आहेत जे सहसा कोणाला माहित नाहीत.

आज या लेखातून आपण तेच दुष्परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे हळद नेमकी कशी वापरावी, कोणी वापरावी आणि किती प्रमाणात वापरावी याबद्दलची उत्तरे मिळतील आणि हळदीचा सावधपणे वापर करता येईल.

जे कपल्स प्रेग्नेंन्सी प्लानिंग करत असतील त्यांनीही हळदीचा कमीत कमी वापर करावा. आहारातून सुद्धा शक्य तितके कमी सेवन त्यांनी करावे. याचे कारण म्हणजे हळद ही शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी करण्याचे काम करते. या शिवाय पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या सुद्धा कमी होते.

मुख्य म्हणजे हळद ही नैसर्गिकरित्या उष्ण असते. परंतु शरीरातील अनेक अशुद्ध घटक नष्ट करून तन आणि मन शांत करण्याचे काम हळद करते. म्हणून हळदीचे सेवन जरूर करावे पण कमी मात्रामध्ये आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले! जेणेकरून त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत.

जे लोक शुगर पेशंट आहेत अर्थात ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना डॉक्टरांकडून रक्त पातळ करणारी औषधे दिली जातात. तसेच या औषधांमुळे रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित होते व एकंदर मधुमेह हा नियंत्रणात ठेवला जातो. मात्र जर अशा रुग्णांनी हळदीचे सेवन केले तर रक्तातील साखरेची मात्र अतिशय जास्त कमी होऊ शकते आणि ही गोष्ट मधुमेहाच्या रूग्णांसाठी अजिबात योग्य नाही.

साखरेचे शरीरातील प्रमाण हे नियंत्रितच असले पाहिजे. ना जास्त ना अतिशय कमी. ते मध्यम असायला हवे. म्हणूनच मधुमेहाचा तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही हळदयुक्त आहार न घेणेच उत्तम!

ज्या लोकांच्या शरीरात कमी रक्ताची समस्या असते त्यांना एनीमिया हा आजार असतो. अशा व्यक्तींनी सुद्धा हळदीपासून दूर राहावे. त्यांनी शक्य तितक्या कमी प्रमाणात हळदीचे सेवन करावे. हळदीचे जास्त सेवन केल्यास शरीरातील लोह वेगाने संपू शकते आणि शरीरात लोहाची कमी निर्माण होते.

याचा थेट प्रवाह रक्तप्रवाहावर पडतो. आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह योग्य रीतीने होण्यासाठी आणि शरीरातील ऑक्सिजनचा स्तर योग्य राखण्यासाठी लोह महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अशावेळी लोहाची समस्या अधिक कमी झाल्यास एनीमिया असणाऱ्या लोकांची समस्या अधिक वाढू शकते.

ज्या लोकांना काविळीची समस्या आहे त्यांनी तर अजिबातच हळदीचे सेवन करू नये. जाणकार सुद्धा कावीळ झाल्यास हळद सेवन न करण्याचा सल्ला देतात. कावीळ पूर्णपणे बरी झाल्यावरच डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हळदीचे सेवन करू शकता.

पण कावीळ असताना व ती बरी झाल्यावरही हळदीपासून काही काळ अंतरच राखावे. ही माहिती तुम्ही सुद्धा आपल्याल आसपासच्या लोकांना द्या. जवळपास कोणी कावीळीचा रुग्ण असेल तर त्याला सुद्धा याबद्दल कळवा आणि सावध करा.

मुतखडा असणाऱ्या रूग्णांनी हळदीचे सेवन टाळावे. मुतखडा असणाऱ्या रुग्णांनी हळदीचे सेवन करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुतखडाच्या समस्येमध्ये हळद हानिकारक ठरू शकते.

ज्या लोकांना वारंवार नाकातून रक्त येण्याची समस्या असेल तर अशा लोकांनी सुद्धा हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे. याशिवाय रक्तस्त्रावाशी निगडीत अन्य कोणताही आजार वा समस्या असेल तरी त्यांनी सुद्धा अजिबात हळदीचे सेवन करू नये आणि जरी केले तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते करावे व अतिशय कमी प्रमाणात करावे.

हळदीचे सेवन केल्यास रक्तप्रवाह संथ होतो आणि स्थिती अतिशय बिघडू शकते. ज्या लोकांचे रक्त पातळ आहे वा ज्यांना अशी समस्या आहे त्यांनी सुद्धा हळदीचे सेवन अजिबात करू नये. कारण हळद ही रक्त अधिक पातळ करण्यचे काम करते. जर सततच्या सेवनाने रक्त अधिक पातळ झाले तर समस्या निर्माण होऊ शकते.

1 कफ बाहेर न पडणे

छातीत कफ जमा होण्याची समस्या अनेकांना असते. शरीरातील कफ बाहेर पडत नसल्यास हळदीच्या दुधाचं सेवन करू नका. हळदीचं दूध प्यायाल्यानं कफ छातीत जमा राहतो. हळदीमुळे कफ सुकतो.

2 श्वासाचा त्रास

श्वास घेण्याचा त्रास होत असल्यास रात्री झोपताना हळदीच्या दूध पिऊ नये. अन्यथा त्रास वाढण्याची शक्यता असते.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *