या अभिनेत्यांनी दोन ते तीन केली आहेत लग्न …या अभिनेत्याने तर चक्क हद्दच पार केली आहे.

या अभिनेत्यांनी दोन ते तीन केली आहेत लग्न …या अभिनेत्याने तर चक्क हद्दच पार केली आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या जीवनात दोन किंवा अधिक लग्न केली आहेत. अनेक सेलिब्रिटींना परिपूर्ण जोडीदाराच्या शोधात दोन ते तीन वेळा परीक्षा द्याव्या लागल्या. याचा अर्थ असा की पहिला विवाह अयशस्वी झाल्यानंतर या कलाकारांनी स्वत: साठी दुसरा जोडीदार शोधला. तरी आज आम्ही आपल्याला टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्सविषयी सांगणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यात दोन किंवा अधिक वेळा लग्न केले आहे.

हितेन तेजवानी:-

जगातील सर्वात गोंडस आणि अतिशय सुंदर जोडप्यांपैकी एक म्हणजे हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान. यांनी 16 वर्षांपूर्वी एकमेकांशी लग्न केले होते. गौरी हितेनची दुसरी पत्नी आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. लग्नाच्या 11 महिन्यांनंतर हितेनने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. यासंदर्भात त्याने म्हटले होते की आपल्या दोघांचे विचार  एकमेकांशी जुळत नाहीत, त्यामुळे घटस्फोट घेणे योग्य वाटले. पहिले लग्न मोडल्यानंतर हितेनने गौरीशी लग्न केले. गौरी प्रधान यांना पाहिल्यानंतर हितेन तिचा प्रेमात पडला.

करणसिंग ग्रोव्हर:-

करण सिंग ग्रोव्हरने परिपूर्ण जोडीदाराच्या शोधात एखदी तीनदा लग्न केले आहे. त्याने प्रथम श्रद्धा निगमशी लग्न केले, परंतु हे लग्न फक्त 8 महिने चालले. यानंतर करणने जेनिफर विगेटशी लग्न केले आणि हे लग्नही अवघ्या 2 वर्षात तुटले. जेनिफर विंगेटने घटस्फोट घेतल्यानंतर करणने बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसूशी हातमिळवणी केली. सध्या बिपाशा आणि करण सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत, या दोघांनाही लग्न करून 4 वर्ष झाली आहेत.

अनूप सोनी:-

टीव्ही सीरियल क्राइम पेट्रोलला होस्ट करणारे अभिनेता अनूप सोनी यांनीही दोन विवाह केले आहेत. त्याचे पहिले लग्न रितूशी झाले होते. रितूला दोन मुलीही आहेत, पण लग्नाच्या काही वर्षानंतर रितूने अनुपवर तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. असं म्हणतात की अनूप, विवाहित आणि दोन मुलींचा पिता असूनही अनूप जूही बब्बरच्या प्रेमात पडला.

धक्कादायक बाब म्हणजे अनूपनेही त्या दिवसांत आपल्या दोन मुलींची जबाबदारी घ्यायला नकार दिला होता आणि अखेर अनूप आणि रितूचा घटस्फोट झाला. दुसरीकडे, जूही बब्बरने 2009 मध्ये पती बिजॉय नंबियार यांनाही घटस्फोट दिला होता. यानंतर अनूप आणि जुहीने २०११ साली लग्न केले.

रोनित रॉय:-

प्रेक्षकांमधील के डी पाठक म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रोनितने 17 वर्षांपूर्वी अभिनेत्री नीलम बोसशी लग्न केले होते. या दोघांमध्ये अप्रतिम केमिस्ट्री सुद्धा दिसली. हे जोडपे टीव्ही इंडस्ट्रीतील पॉवर कपल्सपैकी एक आहे. परंतु  नीलम बोस ही रोनित रॉयची दुसरी पत्नी आहे.

समीर सोनी:-

टीव्ही अभिनेता समीर सोनी सध्या पत्नी नीलम कोठारीसमवेत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. परंतु नीलम कोठारी ही समीरची दुसरी पत्नी आहे. समीरने पहिले लग्न मॉडेल आणि अभिनेत्री राजलक्ष्मी यांचा सोबत केले होते. पण हे लग्न केवळ 1 वर्ष टिकू शकले आणि दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर राजलक्ष्मीने अभिनेता राहुल रॉयशी लग्न केले, पण त्यांचा ही 4 वर्षानंतर ब्रेकअप झाला.

संजीव सेठ:-

प्रसिद्ध टीव्ही सीरियल ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये अक्षराच्या आई-वडिलांची भूमिका करणारे संजीव सेठ आणि लता साभरवाला हेही खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहेत. होय लता आणि संजीव सेठ यांनी २०१० मध्ये एकमेकांशी लग्न केले होते. त्याना एक मुलगा देखील आहे. पण लता संजीव सेठ यांची दुसरी पत्नी आहे. १९९३ मध्ये संजीवने आपली पहिली मराठी अभिनेत्री रेशम टिपणीसशी लग्न केले होते, परंतु 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. रेशम आणि संजीव यांना दोन मुलेही आहेत.

सचिन त्यागी:-

रिक्षादा खान आणि सचिन त्यागी हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडपे आहे. सचिनचे दुसरे लग्न हे रिक्षांदाशी झाले आहे. पहिल्या लग्नापासून त्याला दोन मुलीही आहेत. तरी रक्षांद आणि सचिन यांचे प्रेम इतके प्रखर होते की, रिक्षादाचा धर्म किंवा सचिनचे पहिले लग्न दोघेही त्यांच्या प्रेमाच्या मधी येऊ शकले नाही. तुम्हाला माहित असेल की सचिन त्यागी मालिका ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत मनीष गोयनकाची भूमिका साकारत आहेत.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *