तमाशातील मुलीच्या प्रेमाची व्यथा दर्शविणारा ‘लल्लाट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…चित्रपटाबाबत लोकांमध्ये उत्सुकता…

तमाशातील मुलीच्या प्रेमाची व्यथा दर्शविणारा  ‘लल्लाट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…चित्रपटाबाबत लोकांमध्ये उत्सुकता…

मराठी चित्रपट सृष्टीत अनेकदा उमदा पद्धतीची चित्रपट आपणांस पाहायला मिळाले. ज्यात काही दिग्दर्शकांनी आणि कलाकारंनी आपल्या चांगल्या कलाकृतींचे प्रदर्शन करून लोकांच्या मनात एक वेगळे अशे स्थान निर्माण केले आहे. असाच एक चित्रपट “एम आर जोकर एंटरटेनमेन्ट” निर्मिती संस्था घेऊन येत आहे. “लल्लाट” असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे हे आहेत आणि मोहन गिरजप्पा जाधव चित्रपटाचे निर्माते आहेत.

काल ‘लल्लाट’ या चित्रपटाचे पहिले ॲाडीशन प्राईड इन होटल लातूर येथे पार पडले.यांत ५००-६०० कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली. लातुर या शहरात लल्लाट च्या मुख्य अभिनेत्रीसाठी ॲाडीशन घेण्यात आले आहेत तसेच दुसरे ॲाडीशन हे पुणे येथे होणार आहे.

या चित्रपटात मोहन गिरजप्पा जाधव, सोमनाथ येलनुरे, तसेच रोहित राव नरसिंगे हे कलाकार पदार्पण करत आहेत.या चित्रपटात तमाशा आणि तमाशातील मुलीच्या प्रेमाची व्यथा दर्शविण्यात येणार आहे.चित्रपटात दाखवण्यात येणार्या काही गोष्टी ह्या खर्या आयुष्यातील घडामोडीशी निगडीत आहेत

चित्रपट बनविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तमाशा काय आहे त्याची दुसरी बाजू पण लोकांना माहीत असावी. तसेच या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांच्या मते हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाल्यास एक नवा इतिहास रचेल.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *