दररोज रिकाम्या पोटी या गोष्टीचे सेवन केल्याने होऊ शकतात असे चमत्कारिक फा-यदे

दररोज रिकाम्या पोटी या गोष्टीचे सेवन केल्याने होऊ शकतात असे चमत्कारिक फा-यदे

आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत जा गोष्टी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला खूपच फा-यदा होतो. या गोष्टींच्या मदतीने आपल्याला बर्‍याच रोगांपासून दूर राहता येते. म्हणून तुम्ही दररोज सकाळी या गोष्टींचे सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर या गोष्टी कोणत्या आहेत आणि सकाळी रिकाम्या पोटी खाण्याने त्याचा शरीराला काय फा-यदा होतो हे आपण जाणून घेऊ या.

कोमट पाणी:-

आपल्याला माहीत आहे की कोमट पाणी आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते आणि कोमट पाणी पिण्याने पोटावर त्याचा चांगला परिणाम होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याने शरीर डिटॉक्स होते आणि शरीरात असणारे विषद्रवे बाहेर टाकली जातात.

या व्यतिरिक्त कोमट पाण्यामुळे चयापचय चांगले होते आणि पोटावर असलेली चरबी सुद्धा कमी होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि शरीराला निरोगी व स्वच्छ ठेवायचं असेल तर दररोज सकाळी उठून कोमट पाणी प्यावे.

मनुका:-

मनुके आरोग्यासाठी कधीही चांगले मानले जातात आणि मनुके खाल्ल्याने शरीराला त्याचे खूप फा-यदे होतात. आयुर्वेदानुसार जे लोक दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुके खातात त्यांच्या शरीरात रक्ताचा कधी अभाव पडत नाही.

वास्तविक मनुकामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते जे रक्त वाढविण्याचे कार्य करते. याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने शरीराची उर्जा देखील चांगली राहते आणि शरीराला थकवा जाणवत नाही.रोज झोपण्यापूर्वी एका भांड्यात मनुके भिजवत ठेवावे आणि सकाळी हेच पाणी काढून मनुके खावी. असे रोज केल्याने शरीर निरोगी व स्वच्छ राहते.

बदाम:-

आपल्याला माहीतच असेल की बदाम खाण्याने मेंदूवर चांगला परिणाम होतो. म्हणून डॉक्टर दररोज सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाण्याचा सल्ला देतात. दररोज सकाळी कमीतकमी 5 ते 10 भिजलेले बदाम खावेत असे केल्याने मेंदूवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल आणि शरीराला ऊर्जा देखील मिळेल. तथापि, बदामाची साल काढून खाल्ल्यावर त्याचा खूप सकारात्मक परिणाम दिसतो. कारण टॅनिन्स नावाचा घटक बदामाच्या सालामध्ये आढळतो, जो पोषक द्रव्यांना शोषण्यापासून प्रतिबंधित करतो.

पपई:-

पपई खाल्ल्याने पोट निरोगी राहतं. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास पोट व्यवस्थित स्वच्छ होण्यास मदत होते. तर ज्या लोकांना पोटाची समस्या आहे त्यांनी पपई खावे. गॅस ऍसिडिटी अशा आजारांवर विजय मिळवता येतो आणि बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळतो.

लिंबू पाणी:-

लिंबू पाण्याचे असंख्य असे फा-यदे आपल्या शरीराला मिळतात. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोट योग्य प्रकारे काम करते आणि वजन सुद्धा कमी करण्यास मदत करते. दररोज सकाळी जर आपण प्रथम एक ग्लास लिंबूपाणी पिले तर याचे असंख्य असे फा-यदे आपल्या शरीराला मिळतात. आपली इच्छा असल्यास आपण या पाण्यात मध देखील घालू शकता.

रोज सकाळी वर उल्लेख केलेल्या कोणत्याही गोष्टींचा समावेश आपल्या आयुष्यामध्ये केला तर याचा चांगला परिणाम दिसण्यास सुरवात होईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *