सांधेदुखी असो वा वजन कमी करणे असो…अनेक रोगांमध्ये आपल्याला याप्रकारे फायदेशीर ठरू शकते आले…त्यासाठी करा याप्रकारे वापर

सांधेदुखी असो वा वजन कमी करणे असो…अनेक रोगांमध्ये आपल्याला याप्रकारे फायदेशीर ठरू शकते आले…त्यासाठी करा याप्रकारे वापर

आले आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते आणि म्हणूनच प्रत्येकजण आले खाण्याची शिफारस करतो. आले हा एक प्रकारचा मसाला आहे. जो भाजी आणि चहा बनवताना जास्त वापरला जातो, तसेच बरेच लोक आले पाणीही पितात.

आल्याचे पाणी पिण्यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात आणि तुम्हाला बर्‍याच आजारांपासून यामुळे दूर राहता येते.

तसे आले पाणी तयार करणे खूप सोपे आहे. त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी पाणी ठेवा. या पाण्यात आले बारीक करून घाला आणि कमीतकमी 5 मिनिटे उकळवा आणि नंतर हे पाणी थंड करून या पाण्याचे सेवन करा. यामुळे आपल्याला अनेक असे फायदे मिळतील.

पोट साफ राहते:-

जे लोक नियमित हे पाणी पितात त्यांचे पोट चांगले राहते. आल्याचे पाणी पिल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होत नाही. त्याचबरोबर अन्नही पचन होते. जर पाचक प्रणाली कमकुवत असेल तर, या पाण्याचे सेवन आपण नक्की करा.

हे पाणी पिण्याने आपली पचनशक्ती मजबूत होईल. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठतेच्या बाबतीत दररोज सकाळी आलेचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.

सर्दी होत नाही:-

आले व तुळशीचा काढा एकदम गुणकारी. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर हा काढा औषधी व रूचकर ठरतो. यात काळ्या तुळशीची पाने, सुंठ पावडर वा किसलेले आले, जेष्ठमध, भाजून कुटलेली अळशी चहाच्या पातीचे तुकडे, घालून पाणी अर्धे आटेपर्यंत उकळावे. त्यात गुळ घालून, गाळून हा काढा प्यायला द्यावा. छातीत कफ असल्यास लोखंडाच्या पळीत टाकणाखार गरम करावा व ती लाही पिण्यापूर्वी मिसळावी.

मधुमेहासाठी योग्य:-

साखरेची पातळी रक्तामध्ये जास्त असेल तर त्यामुळे शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतात. जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यामुळे नर्व्ह डॅमेज अथवा अन्य काही रोग उद्भवण्याची शक्यता असते.

पण हे सर्व दुष्परिणाम कमी करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. अभ्यासात सिद्ध झाल्याप्रमाणे आल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण हे 12 टक्के कमी होण्यास मदत होते. तसंच याचा परिणाम त्वरीत होतो त्यासाठी वाट पाहावी लागत नाही.

वजन कमी होते:-

वजन कमी करण्यासाठी, आपल्या आहारात एक ग्लास आल्याच्या पाण्याचा समावेश करा. आले पाणी पिण्यामुळे वजन कमी होते. दररोज सकाळी हे पाणी पिण्यामुळे शरीराची चरबी कमी होते आणि वजन कमी करणे आपल्याला सुलभ होते. त्यामुळे जास्त वजनाने त्रस्त असलेल्या लोकांनी आले पाणी अवश्य प्यावं.

पीरियड:-

आल्याचा तुम्ही नियमित तुमच्या अन्नपदार्थांमध्ये वापर केल्यास, तुम्हाला पाळीचा त्रास सहसा होत नाही. आलं हे उष्ण असतं. तसंच पाळीच्या वेळी तुमच्या पोटातून येणाऱ्या कमी करण्यासाठीही आल्याच्या उपयोग होतो.

यातील गुणधर्म पाळीच्या वेळी पोटातून येणाऱ्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पाळीच्या वेळी पोटामध्ये जास्त गॅस तयार होत असतो. आल्याच्या सेवनाने गॅस कमी होऊन पाळीचा त्रासही कमी होतो.

उलट्या होत नाहीत:-

आपल्याला उलट्या झाल्यासारखे वाटत असल्यास आल्याचे पाणी पिणे चांगले मानले जाते. आल्याचे पाणी पिण्याने मन ठीक होते आणि उलट्यांचा त्रास कमी होतो.

तसेच बऱ्याच जणांना पोटाच्या समस्या असतात. मुख्यत्वे अपचनामुळे अल्सरसारखी समस्या काही लोकांना उद्भवतात. पोटाचा अल्सर हा अतिशय त्रासदायक आजार आहे.

फटिग येणं, जळजळ होणं आणि सतत मळमळत राहणं ही याची लक्षणं आहेत. पण आल्याची पावडर यावर एक चांगला उपाय आहे. यामध्ये असणारे इन्फ्लेमेटरी प्रोटीन्स पोटाच्या अल्सरची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *