सर्दीपासून ते पोटाच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे लवंग…या आयुर्वेदीक पद्धतीने आपण त्याचा उपयोग केल्यास मिळू शकतात हजारो फायदे.

सर्दीपासून ते पोटाच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे लवंग…या आयुर्वेदीक पद्धतीने आपण त्याचा उपयोग केल्यास मिळू शकतात हजारो फायदे.

आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण तसेच धावत्या जगात आज लोकं स्वताकडे दुर्लक्ष करत आहेत. तेव्हा मग लहान आजार दुर्लक्ष केले जातात आणि काही काळानंतर ते एका मोठ्या रोगांचे कारण बनते. आयुर्वेद नेहमी अशा आजारांना ठीक करण्याचे काम करतो.

परंतु, आयुर्वेदाचा सध्या वापर जास्त होत नसल्याने, बहुतांश लोकांना याबद्दल माहिती नसते. मुख्य म्हणजेच आपल्या घरात उपलब्ध असलेल्या अशाच काही पदार्थांचाच उपयोग छोट्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हळद, मिरी, ओवा, लवंग आदी विविध मसाल्यांचा वापर जरी आज जेवण चविष्ट बनविण्यासाठी करत असलो, तरी याचा उपयोग विविध आजारांच्या उपचारासाठी केला जातो. भारतात लवंगचा वापर मसाला म्हणून प्रामुख्याने करण्यात येतो. पण याचे अनेक फायदेशीर गुणधर्म सुद्धा आहेत.

सर्दी खोकला

खोकल्यामध्ये फायदेशीर :-

आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील लवंगाचा फायदा होतो. लवंगाचा नियमित वापर केल्यास या समस्येपासून सुटका मिळेलच. पण रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन लवंग चघळल्यास आपला खोकला सुद्धा दूर होईल आणि आपल्या तोंडाची दुर्गंधीही नाहीशी होईल.

आंबटपणा

पोटाच्या समस्येवर फायदेशीर:-

लवंगात असलेल्या गॅस्ट्रिक रसामुळे आपली पचनक्रिया सुधारते. यासाठी आपण दोन लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर ते पाणी थंड झाल्यावर त्याचे सेवन करा. असे रोज तीन वेळा केल्याने आपली गॅसची समस्या दूर होण्यास आपल्याला मदत होईल. लवंग हे गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर एकदम गुणकारी ठरते.

प्रतीकात्मक चित्र

दातदुखीमध्ये फायदेशीर:-

आपल्याला माहित असेल की आजकाल टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो. याचे कारण म्हणजे आपल्या दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. जर आपले दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दातावर ठेवावे, असे केल्यास आपल्याला दातदुखी पासून त्वरित आराम मिळेल.

केस गळणे

ज्या लोकांचे केस गळतात किंवा कोरडे राहतात ते लवंगापासून बनविलेले कंडिशनर वापरू शकतात. केस लांब आणि जाड करण्यासाठी लवंगाचा देखील वापर केला जातो. लवंगाच्या पाण्याने केस धुतल्यास आपले केस दाट आणि मजबूत बनतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *