बद्धकोष्ठता, पोटदुखी, रक्ताची कमतरता, हाडांचे आजार…कोणतेही रोग असो…फक्त या फळांपासून करा हे उपाय…परिणाम आपल्या समोर असतील

बद्धकोष्ठता, पोटदुखी, रक्ताची कमतरता, हाडांचे आजार…कोणतेही रोग असो…फक्त या फळांपासून करा हे उपाय…परिणाम आपल्या समोर असतील

खूबानी म्हणजेच जर्दाळू हे एक बीजयुक्त फळ असून हे खाण्याचे अनेक फायदे आहेत. या छोट्याश्या फळात अनेक प्रकारची व्हिटॅमीन्स आणि पोषक तत्त्व आहेत. जर्दाळू हा फायबरचा खूप चांगला स्त्रोत आहे. जर्दाळू खाण्याने डोळे, हृदय, त्वचा, डायबेटीस आणि कॅन्सर यासारख्या प्रत्येक रोगावर हे,

गुणकारी ठरतं. मुख्य म्हणजे या फळाची तब्बल 3000 वर्षाआधीपासून भारतात शेती केली जात आहे. भारतातील दुर्गम डोेगराळ भागात उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश यासारख्या ठिकाणी याचं उत्पादन केलं जातं. या लेखात आम्ही तुम्हाला जर्दाळूचे फायदे, वापर आणि नुकसान सांगणार आहोत.

जर्दाळूमध्ये कॅल्शियम, प्रथिने, जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, फायबर, लोह, कार्बोहायड्रेट, मॅंगनीज, जस्त इत्यादींसह जीवनसत्त्वे अ, बी, सी, ई असतात.

प्रतीकात्मक चित्र

पचनक्रिया चांगली होते:-

जर्दाळूमुळे पचनक्रिया चांगली होते. पोट निरोगी राहते. त्यामुळे संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, अन्न योग्य प्रकारे पचते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता, पोटदुखी इत्यादी समस्या आहेत. त्याचा आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश केला पाहिजे.

प्रतीकात्मक चित्र

हाडांच्या मजबूतीसाठी

जर्दाळूच्या सेवनाने हाडं बळकट होण्यास मदत होते. शिवाय यामध्ये मॅग्नेशिअम, कॉपर,फॉस्फरस आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक असल्याने ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. तसंच यामध्ये कॅल्शियमचे प्रमाणही अधिक असते. कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात त्यामुळे जर्दाळूचं सेवन करणं फायदेशीर आहे.

प्रतीकात्मक चित्ररक्ताची कमतरता भरुन निघते:-

शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील रक्त वाढावं यासाठी फळांचा, भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्यातलंच एक फळ म्हणजे जर्दाळू. जर्दाऴूमध्ये आर्यन आणि कॉपर हे पोषक घटक असतात. हे घटक रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे तुमच्या आहारात जर्दाऴूचा समावेश केला पाहिजे.

प्रतीकात्मक चित्र

डोळ्यांसाठी फायदेशीर:-

सतत कॉम्प्युटरवर काम केल्यामुळेही डोळ्यांवर ताण येतो. यासाठी जर्दाळूचा रस पिणं फायदेशीर ठरतं. या रसमध्ये ‘व्हिटॅमिन अ’चं प्रमाण अधिक असतं आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी शरीरात ‘व्हिटॅमिन अ’चं प्रमाण योग्य राहिलं पाहिजे. शरीरात जर ‘व्हिटॅमिन अ’ची कमतरता असेल तर अशा व्यक्तींनी जर्दाळूच्या रसाचं नक्की सेवन केलं पाहिजे.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर:-

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम केसांवर आणि त्वचेवर होतो. शिवाय आजकाल केसगळतीची समस्याही वाढलीये. ज्या व्यक्तींचे केस गळतात त्यांनी जर्दाळू खावं. यामध्ये ‘व्हिटॅमिन अ’ प्रमाणेच ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर असते. तसेच ‘व्हिटॅमिन सी’मुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

सुरकुत्यांवरती प्रभावी जर्दाळू:-

नियमितपणे जर्दाळूचं सेवन केल्यास त्वचेवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. जर्दाळूमध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ए या जीवनसत्त्वामुळे त्वचेवरील वृद्धावस्थेची लक्षण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जर्दाळूचे सेवन करण्यासोबतच तुम्ही चेहऱ्यावर पेस्टच्या स्वरूपातही याचा वापर केल्यास लवकर परिणाम दिसून येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होण्यास मदत होईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *