हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी करा अशाप्रकारे शेंगदाण्याचे सेवन….मिळतील आपल्याला अनेक आश्चर्यकारक फायदे.

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी करा अशाप्रकारे शेंगदाण्याचे सेवन….मिळतील आपल्याला अनेक आश्चर्यकारक फायदे.

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे घरी अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खूप ठिकाणी लहान दवाखाने बंद आहेत. त्यामुळे लहान सहान कारणांसाठी लोक रुग्णालयात जाणं टाळतात.

त्यामुळे घरी बसून फारशी हालचाल होत नाही.  तसंच गरमीच्या वातावरणात फारशी भूक लागत नसल्यामुळे आहार व्यवस्थित घेतला जात नाही. परिणामी गॅस, एसिडिटी, पोट साफ न होणे, लठ्ठपणा यासारख्या अनेक समस्या उद्भवत असतात.

पण घरगुती उपायांचा वापर  करून आपण या समस्यांना स्वतःपासून लांब ठेवू शकता. आज आम्ही आपल्याला  भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे सांगणार आहोत. इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत आपल्याला शेंगदाणे सहज आणि स्वस्त मिळू शकतात. रात्री भिजवलेल्या शेंगदाण्याचं सेवन जर आपण केलं तर आपले आरोग्य चांगलं राहतं.

भिजलेल्या शेंगदाण्यांचे सेवन हृदयासाठी फायदेशीर आहे - सूचक चित्र

शेंगदाण्यांमध्ये अनेक प्रभावी गुण असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकता. एका रिसर्चनुसार शेंगदाण्यांमध्ये कार्डियोप्रोटेक्टिव गुण भरपूर प्रमाणात असतात. कार्डियोप्रोटेक्टिव गुणांमुळे हृदयाच्या रोगांपासून आपल्याला लांब राहता येतं.

सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन केल्याने गॅस आणि आंबटपणाची समस्या दूर होते - सूचक चित्र

शेंगदाण्याच्या सेवनाने गॅस, पोट साफ न होण्याची समस्या दूर होते. कारण शेंगदाण्यात डाएटरी फायबर्स असतात. त्यामुळे सतत पोट साफ होण्यास त्रास होत असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर शेंगदाण्याचे सेवन करा. यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन केल्यास सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकते - सूचक चित्र

सांधेदुखीचा त्रास कमी होतो:-
भिजलेल्या शेंगदाण्यांचे सेवन दररोज सकाळी केले तर यामुळे सांध्यातील त्रास दूर होतो. भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन केल्यास सांध्यातील वेदना कमी होऊ शकतात.

भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन केल्याने पाठदुखीची समस्या दूर होईल - सूचक चित्र

पाठदुखीचा त्रास संपतो:-
पाठदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन दररोज सकाळी करावे. भिजलेल्या शेंगदाण्यांचे सेवन केल्याने पाठीच्या दुखण्यापासून आपल्याला मुक्तता मिळते.

दररोज सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्या खाण्याने स्मरणशक्ती वाढते - सूचक चित्र

ज्या प्रमाणे ड्राय फ्रुट्सचे सेवन करणं आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतं. त्याप्रमाणेच शेंगदाणे सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. या फॅटी एसिड्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून सकाळी लवकर उठून अभ्यास करत असलेल्या मुलांना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंधित करण्यासाठी उपयुक्त आहेत - सूचक चित्र

कर्करोग:-

भिजलेल्या शेंगदाण्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यात मदत करतात. दररोज भिजलेल्या शेंगदाण्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

भिजलेल्या शेंगदाण्यांचे सेवन करणे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे - सूचक चित्र

प्रत्येकालाच आपली त्वचा दीर्घकाळ चांगली आणि चमकदार दिसावी असं वाटत असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ब्यूटी प्रोडक्टसचा वापर केला जातो. पण केमिकल्सयुक्त क्रिममुळे आपली त्वचा खराब होण्याची शक्यता असते शेंगदाण्यात एंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे जर आपण रोज सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केले तर आपली त्वचा चांगली राहील.

भिजलेल्या शेंगदाण्यांचे सेवन देखील शरीरात रक्ताची कमतरता कमी करू शकते - सूचक चित्र

अशक्तपणावर मात:-
भिजलेल्या शेंगदाण्यांचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर होते. अशक्तपणा म्हणजेच रक्त कमी असलेल्या रुग्णांनी दररोज भिजलेल्या शेंगदाण्याचे सेवन करावे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *