चेहऱ्यावरील वांग, डाग, काळी त्वचा अशी कोणतीही समस्या असो…फक्त करा रोज सकाळी हे घरगुती उपाय…डॉक्टरांची गरज सुद्धा भासणार नाही

चेहऱ्यावरील वांग, डाग, काळी त्वचा अशी कोणतीही समस्या असो…फक्त करा रोज सकाळी हे घरगुती उपाय…डॉक्टरांची गरज सुद्धा भासणार नाही

चेहऱ्यावर जखमा अथवा डाग दिसायला खूपच खराब वाटतात. या डागांमुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. तसेच आत्मविश्वासही कमी होतो. जखमांच्या खुणा मिटवणे कठीण नाही मात्र त्यासाठी तुम्हाला काही उपाय नियमितपणे करावे लागतील.

काही नैसर्गिक पदार्थांमध्ये ब्लीचिंग एजंट असते जे डाग कमी करण्यास मदत करतात. याच्या प्रयोगाने काही दिवसांतच चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्सचे डाग, डार्क सर्कल, जखमांच्या खुणा आणि चिकनपॉक्सचे निशाण कमी होण्यास मदत होईल.

फ्रीकलल्स म्हणजे काय:-

चेहऱ्यावरील वांग म्हणजेच पिगमेंटेशन ही एक अशी समस्या आहे, जी महिलांना वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यात जाणवतेच. पिगमेंटेशनमुळे त्वचा असमान आणि वाईट दिसते.

रंगद्रव्य ही त्वचेची सामान्य समस्या आहे. जी कुणालाही होऊ शकते. या समस्येखाली, त्वचेचा काही भाग गडद रंगाचा होतो आणि चेहेर्‍यावर लहान डाग दिसू लागतात.

रंगद्रव्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्वचेतील मेलेनिनची पातळी वाढणे. त्यामुळे वेळत या समस्येसंदर्भात उपाय केले पाहिजेत. तर मग विलंब न करता पिग्मेन्टेशनपासून मुक्त होण्यासाठी कोणते मार्ग आहेत ते आपण जाणून घेऊया.

पिगमेंटेशनच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. जोपर्यंत तुम्हाला परिणाम दिसत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता.

एपल साईडर व्हिनेगर हे पिगमेंटेशनसाठी खूप चांगला घरगुती उपायांपैकी एक आहे. यामध्ये पाण्याचे काही थेंब टाकून ते पातळ करून घ्या. नंतर ते चेहऱ्यावरील प्रभावित ठिकाणी लावा. 5 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा. दिवसातून दोनदा ही प्रक्रिया तुम्ही करू शकता.

बदामाच्या मदतीने पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी भिजलेल्या बदामाची पेस्ट बनवा. या मिश्रणात तुम्ही दूधही घालू शकता.

नंतर यात इतर साहित्यही मिक्स करा आणि वांग डाग असलेल्या भागावर लावा. हा उपाय रात्री झोपण्याआधी करावा रात्रभर चेहऱ्यावर हे मिश्रण तसंच राहू द्या आणि सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. दोन आठवडे नियमितपण रात्री झोपण्याआधी हा उपाय करून पाहा. तुम्हाला डागांपासून सुटका मिळेल

जर तुम्हाला पिगमेंटेशनपासून जलद सुटका हवी असेल तर संत्र्याचा घरगुती उपाय नक्की करून पाहा. यासाठी सर्वात आधी एका संत्र्याचं साल उन्हात पूर्ण सुकेपर्यंत ठेवा. सुकल्यावर या सालाची बारीक पावडर करा आणि या पावडरमध्ये वरील साहित्य घाला.

चांगल मिश्रण करा आणि चेहऱ्यावरील प्रभावित जागी लावा. जवळपास 20 मिनिटं हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच राहू द्या. मग कोमट पाण्याने धुवून टाका. पिगमेंटेशन दूर करण्यासाठी आणि जलद परिणामासाठी हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा करू शकता.

पपई पिगमेंटेशनवरील अजून एक घरगुती उपाय आहे. या घरगुती उपायासाठी एका बाऊलमध्ये सर्व साहित्य मिक्स करून चांगलं फेटून घ्या. आता हे मिश्रण तुमच्या त्वचेवर लावा आणि 30 मिनिटं तसंच राहू द्या. आता चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

पिगमेंटेशनसाठी चेहऱ्यावर एलोव्हेरा लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता. तुम्हाला तुमच्या त्वचेत फरक नक्कीच जाणवेल. त्वचा डागविरहीत आणि चमकदार दिसेल.

मध आणि लिंबाचा फेसपॅक :-

पिगमेंटेशन दूर करण्यासाठी तुम्ही मध आणि लिंबाचा फेसपॅक खूपच प्रभावी ठरतो. यासाठी तुम्ही एक चमचा मधात दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करून तो चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक 20 मिनिटं तसाच राहू द्या आणि मग धुवून टाका.

बदाम आणि दही:-

पिगमेंटेशनवरील सोप्या उपायांमध्ये दही आणि बदामापासून बनवलेला फेसपॅक आहे. तीन ते चार बदाम वाटून घ्या आणि ते दह्यात मिक्स करा. ही पेस्ट बनवून झाल्यावर ती चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक 10 मिनिटं चेहऱ्यावर तसाच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

लिंबू आणि गुलाबपाणी:

पिगमेंटेशनच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि गुलाबपाण्याचाही वापर करू शकता. हा फेसपॅक शरीराचा जो भाग काळवंडला आहे त्यावर लावा. आता दहा मिनिटं हा फेसपॅक तसाच राहू द्या आणि धुवून टाका. हा उपाय तुम्ही रोज केल्यास तुम्हाला लवकरच त्वचेत फरक जाणवेल.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *