या कलाकारांचे आपल्या सावत्र आई सोबत आहेत असे संबंध…जाणून आपले सुद्धा होश उडतील…यामधील एका कलाकाराने तर …

या कलाकारांचे आपल्या सावत्र आई सोबत आहेत असे संबंध…जाणून आपले सुद्धा होश उडतील…यामधील एका कलाकाराने तर …

सावत्र आई हे ऐकणे आपल्याला खूप नकारात्मक वाटते परंतु प्रत्यक्षात हे नाते इतके नकारात्मक नाही आहे. आपणास सांगू इच्छितो कि असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत, ज्यांच्या सावत्र आईने त्यांच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका निभावली आहे.

या सेलिब्रिटींनी त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीला अगदी आनंदाने स्वीकारले आणि त्यांच्या सावत्र आईशी नातेसंबंध जोडले, जे सर्वांसाठी एक चांगले उदाहरण आहे. चला तर मग जाणून घेऊया कि असे कोणकोणते स्टार्स आहेत ज्यांचे त्याच्या सावत्र आईशी खूप चांगले नाते संबंध आहेत.

सलमान खान-हेलन केलर:-

आपल्याला माहित असेल कि सलीम खान यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांनी प्रथम सलमाशी लग्न केले आणि मग दुसऱ्यांदा हेलेनशी लग्न केले. पण जेव्हा सलीम यांनी हेलेनशी लग्न केले तेव्हा हेलनला त्याच्या पहिल्या पत्नीचा म्हणजेच सलमाचा आणि तिच्या तीन मुलाचा म्हणजेच सलमान,

अरबाज आणि सोहेलचा खूप तिरस्कार सहन करावा लागला होता. पण यानंतर, हेलन हळूहळू स्वत: ला जुळवून घेत गेली आणि संपूर्ण कुटुंबावर आपली छाप टाकण्यात यशस्वी झाली. त्यामुळेच आता सलमान, अरबाज आणि सोहेल हेलेनलाही आपल्या खऱ्या आईप्रमाणेच मानतात आणि तितकेच प्रेम सुद्धा करतात.

सारा अली खान-करीना कपूर:-

बॉलिवूडचा नवाब अर्थात सैफ अली खानने ही दोन लग्न केली आहेत. आपल्या पहिल्या पत्नीपासून म्हणजेच अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफने करीनासोबतन अगदी थाटामाटात लग्न केले. यापूर्वी सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले होती. पण या दोन्ही मुलाचे सुद्धा त्याची सावत्र आई करीनाशी खूप चांगले संबंध आहेत. अगदी सारा आणि करीना या एकमेकांना खूप चांगल्या मैत्रिणी मानतात.

शाहिद कपूर-सुप्रिया पाठक:-

शाहिद कपूर याचे सुद्धा त्याच्या सावत्र आई सुप्रिया पाठक यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. वास्तविक शाहिद हा पंकज आणि त्याची पहिली पत्नी नीलिमा अझिम यांचा मुलगा आहे. नीलिमापासून विभक्त झाल्यानंतर पंकज यांनी सुप्रिया पाठक यांच्याशी लग्न केले. पण तरी सुद्धा शाहिद आपल्या सावत्र आई सुप्रियाचा खूप आदर करतो.

सनी देओल-हेमा मालिनी:-

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी ४० वर्षांपूर्वी लग्न केले. त्यापूर्वी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले होते आणि त्यांना चार मुले आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत. ईशा देओल आणि आहना देओल. पण अनेकांना प्रश्न पडला असेल हेमा मालिनी यांचा सावत्र मुलगा सनी देओलसोबत कसे नाते असेल.

पण खुद्द हेमा मालिनी यांनी सनी देओल आणि त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. एका इवेंटमध्ये हेमा मालिनी यांनी सांगितले होते की त्यांच्या आणि सनीमधील नात्या विषयी अनेकांना जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की त्यांच्यामध्ये चांगले नाते आहे. राजस्थानमध्ये जेव्हा हेमा मालिनी यांचा अपघात झाला होता तेव्हा त्यांना पाहण्यासाठी घरी जाणारा सनी देओल हा पहिला व्यक्ती होता.

शबाना आजमी-फरहान अख्तर:-

झोया-फरहान आणि शबाना आझमी यांचं नातंही काहीसं असंच आहे. शबाना आझमी जावेद अख्तर यांची दुसरी पत्नी आहे. फरहान आणि झोया त्यांची पहिली पत्नी हनी इरानी यांची मुलं आहेत.

फरहान यांनी या कार्यक्रमात सांगितलं आहे की त्यांना आपल्या वडिलांबाबत काही तक्रारी होत्या. मात्र त्यानंतर शबाना यांच्याशी त्याचं नातं सुधारत गेलं. मात्र याचं श्रेय ते शबाना यांना देतात. कारण त्यांनी या दोघांनाही कधीच परक्यासारखी वागणूक दिली नाही.

पूजा भट्ट-सोनी राजदान:-

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट जेव्हा सोनी रझदानशी लग्न करणार होते तेव्हा त्याच्या मुलीचा म्हणजेच पूजाचा तीव्र विरोध होता. पण, कालांतराने पूजाने स्वत: ला जुळवून घेतले आणि आता तिला तिची सावत्र आई तसेच तिच्या दोन सावत्र बहिणी आलिया आणि शाहिना देखील खूप आवडतात.

अर्जुन कपूर-श्रीदेवी:-

बोनी कपूरने आपली पहिली पत्नी मोना आणि दोन मुले अर्जुन-अंशुला याना सोडून त्यांनी अभिनेत्री श्रीदेवीशी लग्न केले. म्हणूनच अर्जुन आणि अंशुलाने त्याची सावत्र आई श्रीदेवी आणि सावत्र बहिणी जाह्नवी आणि खुशी यांना कधीही आपलेसे मानले नाही. पण श्रीदेवी याच्या निधनानंतर आता अर्जुनचे आणि अंशुलाचे त्यांचे वडील त्याच्या सावत्र बहिणीशी खूप जवळचे नाते आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *