‘तारक मेहता का उल्टा चश्मामधील टप्पूची हालत पाहून आपण सुद्धा व्हाल हैराण…करत आहे आता याप्रकारची कामे`

‘तारक मेहता का उल्टा चश्मामधील टप्पूची हालत पाहून आपण सुद्धा व्हाल हैराण…करत आहे आता याप्रकारची कामे`

9 वर्षांपासून सुरु असलेली प्रसिध्द मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारणा-या कलाकाराने हा शो सोडला आहे.

आम्ही बोलत आहोत, जेठालाल दिलीप जोशी आणि दया भाबी दिशा वाकाणी चा मुलगा टप्पू विषयी. ही भूमिका साकारणा-या भव्य गांधीने हा शो सोडला आहे. असे भव्यच्या आईने सांगितले आहे. एका लीडिंग वेबसाइटला बोलताना त्यांनी सांगितले की, एक नविन संधी मिळाल्यामुळे त्याने हा शो सोडला आहे.

सुरुवातीपासून शोमध्ये होता ‘टप्पू’…

जे स्टार्स ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये सुरुवातीपासून आहेत, त्यामधूनच एक भव्य गांधी होता. 2008 मध्ये त्याने हा शो जॉइन केला होता. तो मुंबईचा राहणारा आहे. शोमध्ये गोगीची भूमिका साकारणारा समय शाह त्याचा कजिन आहे.

टीव्ही शो ”तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेतून भव्य गांधी स्टार बनला. यात जेठालाल आणि दयाबेन यांच्या मुलाची भूमिका त्याने साकारली होती. नुकत्याच भव्यने झूम ला दिलेल्या मुलाखतीत त्याने मालिका का सोडली याचा खुलासा केला

शादी के सियापे’ या मालिकेत भव्य एलियनची भूमिका साकारत आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, या मालिकेत काम करण्याचा अनुभव वेगळाच होता.

जेव्हा भव्यला विचारण्यात आले की तो फक्त कॉमेडीपुरतेच काम करणार का तेव्हा भव्य म्हणाला, मला तारक मेहता का उल्टा चष्मा तसेच गुजराती सिनेमात रडण्याचा सीन करण्यास सांगितले आणि मी ते केले. ते पाहिल्यानंतर माझ्या कामाचे कौतुकही झाले. मला माझ्या भावना चांगल्याप्रकारे एक्सप्रेस करता येतात.

भव्यला तारक मेहताच्या कलाकारांना मिस करतो का असे विचारले असता तो म्हणाला, ते केवळ कलाकार नव्हते तर ते वेगळे कुटुंब होते. मी त्यांना नक्कीच मिस करतो.

पण आयुष्यात पुढे जावेच लागते. ही खूप चांगली मालिका आहे. मात्र मला आणखी वेगळे काहीतरी करायचे होते. म्हणून मी सिनेमात काम केले.

टीआरपीबाबत भव्य म्हणाला, जेव्हा तुम्ही अॅक्टिंग करत असता तेव्हा टीआरपीचा विचार करत नाही. टीआरपी लक्षात घेऊन जर तुम्ही अभिनय केला तर तुम्हाला कठे जायचे हेच लक्षात येणार नाही. भव्यने २०१७मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *