जर आपले पण केस तरुण वयातच पांढरे झाले असतील व आपले केस गळत असतील..तर आजच करा हे आयुर्वेदिक उपाय परिणाम आपल्या समोर असतील.

जर आपले पण केस तरुण वयातच पांढरे झाले असतील व आपले केस गळत असतील..तर आजच करा हे आयुर्वेदिक उपाय परिणाम आपल्या समोर असतील.

अशा लोकांसाठी ही मोठी चिंता आहे की ज्यांचे अगदी लहान वयात केस पांढरे झाले आहेत. पण आपल्या आहाराचा केसांच्या आरोग्यावर विशेष प्रभाव पडतो. केस पांढरे होणे टाळायचे असेल तर चहा, कॉफीचे सेवन कमी केले पाहिजे. तसेच, अल्कोहोलचे अजिबात सेवन करू नये. जास्त आंबट, आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या केसांवर त्याचा  परिणाम होतो. तेल आणि मसालेदार अन्न केसांशी संबंधित समस्या देखील वाढवते.

या सर्वांखेरीज मानसिक ताण, चिंता, धूम्रपान, औषधांचा दीर्घकाळ वापर, केसांचा रंग इत्यादीमुळे केस पिकण्याची, तुटण्याची प्रक्रिया आणखी फास्ट होते. जर आपल्याला हे त्रास टाळायचे असतील तर या उपायांचे अनुसरण करा, जे आपल्या केसांसाठी हे उपाय वरदान ठरतील.

– प्रथम आपण आले किसून घ्या आणि मधामध्ये मिसळा आणि हे मिश्रण आठवड्यातून किमान दोनदा केसांवर नियमितपणे लावा यामुळे आपले केस पिकणे कमी होईल.

– टोमॅटो आणि दही:- या दोंघाच्या मिश्रणामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि निलगिरी तेल घाला आणि आठवड्यातून दोनदा मिश्रणाने आपले डोके मालिश करा यामुळे आपले केस बर्‍याच काळासाठी काळे आणि दाट राहतील.

-वाळलेला आवळा पाण्यात उकळा:- प्रथम वाळलेला आवळा पाण्यात उकळून घ्यावा आणि मेंदी आणि लिंबाचा रस त्यामध्ये मिसळून ते मिश्रण आपल्या केसांवर लावावे. असा विश्वास आहे की असे केल्याने अकाली केसांचे पिकणे थांबते.

-तसेच आपण मेथीचे दाणे बारीक करून मेहंदीमध्ये मिक्स करून. तुळशीची पाने आणि सुक्या चहाच्या पानांचा रस एकत्र करून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट केसांवर लावा आणि २ तास तशीच ठेवा आणि मग हर्बल शैम्पूने आपले केस धुवून घ्या, त्याचा फायदा आपल्यला नक्की होईल.

-१/२ कप खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल हलके गरम करा. त्यात 4 ग्रॅम कापूर घाला. जेव्हा कापूर पूर्णपणे विरघळला जातो तेव्हा या तेलाने मालिश करा. आठवड्यातून एकदा याची मालिश करावी. यामुळे देखील आपल्या केसांना खूप फायदा होईल.

-तसेच खोबरेल तेलात थोडी दही घालून देखील आपण टाळूची मालिश करू शकतो. यामुळे आपले केस आजिबात गळणार नाहीत.

जर आपले केस गळत असतील तर आठवड्यातून एकदा केसांवर तिळाचे तेल लावावे. या तेलाचा सतत वापर केल्याने आपले केस गळणे थांबते.

– अर्धा कप दहीमध्ये एक ग्रॅम काळी मिरी आणि थोडा लिंबाचा रस मिसळा आणि आपल्या केसांवर लावा. -तसेच आपण अक्रोड पाण्यात उकळवून ते पाणी थंड झाल्यावर त्या पाण्याने आपली केस धुवू शकतो. त्यामुळे आपलेकेस नेहमी काळे राहतील. त्यासाठी नेहमी थंड आणि स्वच्छ पाण्याने केस धुवावे.

– तसेच आपण हिरव्या आवळ्याची पेस्ट बनवून केसांच्या मुळांवर लावू शकतो किंवा आवळाच्या पूडमध्ये लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण केसांना लावा. यामुळे देखील आपल्याला बरेच फायदे होतात.

-मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा आणि हेच मेथीचे दाणे बारीक करून त्यामध्ये दही मिसळून ते मिश्रण आपल्या केसावर लावावे व एक तासानंतर आपले केस धुवावे.

 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *