जाणून घ्या टी बॅगचे आपल्याला असणारे हे आश्चर्यकारक असे फायदे…आपल्या अनेक समस्या एक टी बॅग करू शकते नाहीशा

जाणून घ्या टी बॅगचे आपल्याला असणारे हे आश्चर्यकारक असे फायदे…आपल्या अनेक समस्या एक टी बॅग करू शकते नाहीशा

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचा चहा मिळतो. हे वेगवेगळ्या स्वरुपातील चहा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असतात. चहा सोपा आणि पटकन बनवता यावा म्हणून हल्ली त्याच्या टी बॅग्ज तयार केल्या जातात. ज्याचा उपयोग करुन तुम्हाला पटकन चहा बनवता येतो.

टी बॅग्जमुळे चहा पिताना चहाची पावडर किंवा त्यांचे कण मध्ये येत नाहीत. टी बॅग्ज असल्यामुळे ती संपूर्ण पावडर एका बॅगमध्येच राहते. या टी बॅग्जमध्ये असलेल्या चहाचे गुणधर्म तसेच राहिल्यामुळे तुम्हाला ते पुन्हा वापरता येतात.आता या वापरलेल्या टी बॅग्जचे फायदे काय ते जाणून घेऊया.

जुन्या चहाच्या पिशव्या स्वच्छ करण्यात उपयुक्त ठरतील

केसांसाठी फायदेशीर:-

टी बॅग कोमट पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी थंड करून घ्यावं. त्यानंतर या पाण्याने केस धुवून 10 मिनिटांसाठी तसेच ठेवा. जर शक्य असेल तर केसांना आपण मालिशही करू शकता. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाका. यामुळे आपले केस डॅड्रफ फ्री, मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त डोळ्यांसाठीही टी बॅग फायदेशीर ठरते. टी बॅग 5 मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्यांचा थकवा निघून जाईल आणि आराम मिळेल.

आपल्या शूज आणि मोजेमध्ये टी-बॅग ठेवा

पायापासून येणारा वास:-

जर आपण बरेच वेळ शूज आणि मोजे घालत राहिलो तर आपल्या पायांना आणि शूजला वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत आपण आपल्या शूज आणि मोज्यामध्ये मध्ये कोरडी वापरलेली टी-बॅग थोड्या काळासाठी ठेवावी, असे केल्याने त्याचा वास निघून जाईल. त्यामुळे आपल्याला मोजे देखील धुवावे लागणार नाहीत.

चहाची पिशवी ठेवल्याने डोळे शांत होतील

डोळ्यांसाठी टी बॅग्जचा उपयोग करणे हा त्याचा पहिला फायदा फारच प्रसिद्ध आहे. डोळ्यांसाठी हा एक स्वस्त आणि मस्त असा पर्याय असून त्याचा वापर अनेकजण करतात. टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्यामुळे अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली आलेली सूज, काळीवर्तुळे, डोळ्यांचा लालसरपणा कमी होण्यास मदत मिळते. चहामध्ये असलेले कॅफेन आणि अँटीऑक्सिडंट हे घटक डोळ्यांसंदर्भातील तक्रारी दूर करण्यास मदत करतात.

फ्रीजमध्ये पाण्याचा वाटी ठेवा आणि वापरलेली टी-बॅग ठेवा

फ्रीजमधून येणारा वास:-

जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्या जातात, तेव्हा त्या सर्व गोष्टी मिसळल्यानंतर फ्रीजमधून एक विचित्र वास येतो. जेव्हा आपण फ्रीज उघडतो तेव्हा संपूर्ण खोलीत वास पसरतो. तो घालवण्यासाठी, पाण्याची वाटी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यामध्ये वापरलेली टी-बॅग ठेवा असे केल्याने फ्रीजमधील वास नाहीसा होईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *