सांधेदुखी, दातदुखी, केस गळणे, पाठदुखी, अशी कोणतीही समस्या असो…फक्त याप्रकारे करा मोहरीच्या तेलाचा वापर…परिणाम आपल्या समोर असतील

सांधेदुखी, दातदुखी, केस गळणे, पाठदुखी, अशी कोणतीही समस्या असो…फक्त याप्रकारे करा मोहरीच्या तेलाचा वापर…परिणाम आपल्या समोर असतील

मोहरीचे तेल स्वयंपाकघर ते शरीरावर लावण्यापर्यंत वापरले जाते. मोहरीचे तेल स्वयंपाकात वापरले जाणारे एक सामान्य तेल आहे. जे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी वापरले जाते.

मोहरीच्या तेलात असे बरेच घटक आढळतात जे आपल्या शरीरात जखम भरणे, सांधेदुखी किंवा कान दुखणे यासारख्या गोष्टींमध्ये खूप उपयुक्त असतात. आयुर्वेदात आणि बऱ्याच औषधांत याचा वापर केला जातो.

मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने शरीरातील वेदना कमी होऊ शकते. मोहरीचे तेल त्वचेच्या उजळविण्यासाठी चांगले मानले जाते. परंतु ज्यांना अ‍ॅलर्जी आहे त्यांनी ते टाळावे. जाणून घेऊया मोहरीच्या तेलाच्या फायद्यांविषयी….

केसांच्या आरोग्यासाठी:-

केस रुक्ष होणे, खाज, कोंडा यांसारख्या केसांच्या समस्येवर मोहरीचे तेल गुणकारी ठरते. आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करुन त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पूने धुवा. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल व केस चमकदार होतील.

सांधेदुखीत लाभदायक:-

मोहरीचे तेल हे सांधेदुखी, हाडांचे दुखणे अर्थात मांसपेशी दुखत असतील तर त्यावर अतिशय गुणकारी ठरते. नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास,

शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे अथवा सांधेदुखी थांबण्यास मदत मिळते. तसेच यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी असिडमुळेही सांधेदुखी आणि गाठींसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

त्वचेसाठी उपयुक्त:-

मोहरीच्या बियांनी त्वसेस चकाकी येते. मोहरीच्या त्वचा ग्लोईंग करता येते. मोहरीचे तेल त्वचेस तरूण राखण्यास मदत करते. ड्राय स्किन असल्यास मोहरीच्या बीया चांगला उपाय मानला जातो.

मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असल्याने चेहऱ्यावर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यासाठी लाभदायक ठरते. मोहरीच्या तेलात तसेच बियांमध्ये कॅरोटीन आणि ल्यूटिन हे घटक असल्याने अँटी-ऑक्सिडेंट तयार करतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असल्याने हे त्वचेवर अँटी-एजिंगप्रमाणे काम करते आणि त्वचेस तारूण्या प्राप्त होते.

दातदुखीपासून सुटका:-

मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे मीठ मिसळून दातांवर दिवसातून 2 वेळा मसाज केल्यास दातदुखीपासून आराम मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी दररोज मोहरीचे तेल पायांच्या तळव्यांना लावा. हलक्या हाताने तळव्यांना मालिश करा. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारेल. झोप चांगली लागेल. त्याचबरोबर पुरुषांचे शरीर स्वस्थ आणि मजबूत राहील.

कर्करोग टळण्यास मदत:-
मोहरीच्या तेलामध्ये ग्लुकोसिनोलेट गुण असल्याने कर्करोग टळण्यास मदत होते. हे शरिरात कर्करोग सेल्स तयार होऊ देत नाही. तसेच कंबर दुखीचा त्रास असल्यास मोहरीच्या तेलामध्ये थोडासा हिंग, ओवा आणि लसुन मिसळून गरम करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण कंबरेवर लावा. या उपायाने कंबर दुखीचा त्रास कमी होईल.

नवजात शिशूची मोहरीच्या तेलाने मालिश करणे उत्तम राहते. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानंतर स्नान घातल्याने बाळाला सर्दी होण्याची शक्यता राहत नाही आणि सर्दी झालेली असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास सर्दी दूर होईल. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास रक्त वाढते. शरीरात उत्साह, स्फूर्ती राहते. यामुळे शारीरिक थकवासुद्धा दूर होतो.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *