लग्नानंतर पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक मुलींचा मनात येतात हे विचार …सासरच्यानी तर पहिला लक्ष द्यावे

लग्नानंतर पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक मुलींचा मनात येतात हे विचार …सासरच्यानी तर पहिला लक्ष द्यावे

विवाह हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. लग्नानंतर ती तिच्या सासरच्या नवीन घरी आपले जीवन सुरु करते. अशा परिस्थितीत, आपण कधी विचार केला आहे का  जेव्हा वधू पहिल्यांदा तिच्या सासरच्या घरी जाते तेव्हा तिच्या मनात काय विचार येतात? तसे नवविवाहित वधूचे मन वाचणे फार कठीण असते, परंतु तरीही आम्ही आपल्याला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.

– लग्न संपताच, मुलगीला या गोष्टीचा आनंद होतो कि तिची आता भारीभक्म पोशाखातून आणि मेकअपपासून मुक्तता झाली आहे. आणि आता ती आपल्या साध्या कपड्यांमध्ये आनंदाने राहू व फिरू शकते.

– संपूर्ण लग्नात मुलींना सतत तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवण्यास शिकवले जाते. स्टेजवर फोटो काढताना असुदे किंवा एखाद्या नातेवाईकाला भेटताना असो, मुलगी प्रत्येक क्षणी स्मित हास्य ठेवत असते. यामुळे तिचे गाल सुद्धा दुखत असतात. त्यामुळे सुद्धा ती आनंदित होते कि तिला आता सतत हसायला लागणार नाही आहे.

– कित्येक वडीलधाऱ्या लोकांचा लग्नात पाया पडावे लागते. कायम स्टेजवर उभे रहावे लागते. अशा परिस्थितीत वधूचा संपूर्ण शरीरावर ताण पडत असतो. मग तिचा मनात असा पण विचार येतो कि कुठून तरी शरीराचा मसाज करून घ्यावा. पण ती फक्त आपला थकवा दूर करण्याचा विचार करत असते.

– लग्नात बऱ्याच भेटवस्तू मिळतात. अशा परिस्थितीत दुल्हन दुसर्‍या दिवशी त्यांना उघडण्यास उत्सुक असते. तिला आधी तिच्या मित्रांच्या भेटवस्तू उघडण्यास कधीही आवडते.

जेव्हा मुलगी माहेरी असते तेव्हा खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी मुलगी तिच्या लूकबद्दल विचार करत नाही. परंतु सासरमध्ये ती सैल टी-शर्ट आणि पायजामामध्ये बाहेर पडू शकत नाही. सकाळी उठण्यापूर्वी तिला साडी वैगेरे घालावी लागते. यासह तिला तिच्या साडी, ओढणी, लिपस्टिक, केस या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. तिला भीती वाटत असते की या गोष्टीमध्ये तिची काही चूक ना होवो.

लग्नाचा कार्यक्रम संपताच मुलीच्या मनात हनीमूनची कल्पना येऊ लागते. पण जेव्हा ते घडेल तेव्हा ते कसे घडेल,आपले काही चुकणार तर ना असे अनेक विचार मनात येत असतात. ती असा पण विचार करत असते की आपल्याला जोडीदाराबरोबर एकटे राहण्याची संधी कधी मिळणार आहे.

– मुलगी आपल्या माहेरी स्वयंपाकघरात कधीच गेलेली नसते परंतु सासरच्यांनी तिला दुसर्‍या दिवसापासूनच  स्वयंपाकघरात कामे लावलेली असतात. अशा परिस्थितीत ती या प्रकरणामुळे सुद्धा तणावात असते.

– लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी मुलगी आपल्या मैत्रिणीशी बोलते आणि आपला अनुभव कसा होता ते सांगते.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *