वजन कमी करायचं आहे?…तर रात्रीच्या झोपेच्या आधी करा फक्त या तीन गोष्टी…काही दिवसांत आपल्याला फरक जाणवेल…फक्त हे तीन उपाय

वजन कमी करायचं म्हणून आपण डाएट फॉलो करतो खरं. पण वजन कमी न होण्यामगचं प्रमुख कारण म्हणजे डाएटमुळे शरीराला लागणारी पौष्टिक घटकांची कमतरता. चरबी कमी करायची असल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलरीजचं प्रमाण कमी करणं. ते कमी करताना आहारातून सूक्ष्म घटक कमी करा. जेणेकरून, वजन घटण्यास मदत होईल.
वजन कमी करायचं असल्यास व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. पण, तुम्ही जर चुकीचे व्यायाम करत असाल तर तुम्ही वजन कमी करण्याचा हेतू साध्य करू शकणार नाही. पोटाची चरबी कमी करणं चिकाटीचं काम आहे.
लाँग जॉगसारख्या वर्कआउटमुळे काही प्रमाणत तुम्ही वजन कमी करण्यात यशस्वी झाले असाल. पण, कॅलरीज कमी होतील याची काही शाश्वती नाही. त्यामुळे तुमच्या स्नायूंवर ताण पडेल आणि ऊर्जा जास्त लागेल असे व्यायाम करा.
अपुरी झोप देखील वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते. मुख्य म्हणजे वाढलेलं वजन, चरबी कमी होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याच सोबत या सगळ्या गोष्टी सतत बाहेरचं खाणं यावर देखील अवलंबून आहेत, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
संशोधनातून समोर आलं आहे की, चिंता आणि ताण यांचं प्रमाण जर अधिक असेल तर चयापचय प्रक्रिया मंदावते. यामुळे वजन कमी होण्यास अडथळे येतात.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही कॅलरीजची एक मर्यादा ठेवायला हवी. रात्रीच्यावेळी दोन घास कमी खा. ओव्हरइटींग करू नका. जास्तीत जास्त पौष्टीक आणि हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
जेवण बनवताना तुम्ही ज्या तेलाचा वापर करता. त्या तेलात किती प्रमाणात कॅलरीज आहेत. हे आधी पाहून घ्या. जर तुम्ही जास्त तळलेले पदार्थ दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी खात असाल तर तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. ऑलिव ऑईल, नारळाचं तेल किंवा कोणतंही तेल असो. जेवणात तेलाचे प्रमाण कमीत कमी असायला हवं.
रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणा दरम्यान आपण काय आणि किती खाल्ले याचा आपल्या वजनावर परिणाम होतो. जर आपण दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणात खूप गॅप घेत असाल तर जास्त भूक लागल्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही जास्त खाणे सुरू कराल. म्हणून संध्याकाळी स्नॅक्स वेळेवर घ्या.
नेकदा पिण्याच्या पाण्याचे महत्व लोकांना कळत नाही. पाणी फक्त आपल्याला हायड्रेटेड ठेवत नाहीत तर आपल्याला आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि कमी खाण्यास मदत करतात. जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी एक मोठा ग्लास भरून पाणी प्या.
अन्न नेहमी शांत मनाने खावे. जेवताना कधीही टीव्ही पाहू नये. त्यामुळे आपले पोट कधी भरलेले आहे हे देखील आपल्याला कळत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं जातं. काळजीपूर्वक खाल्ल्याने तुम्ही तुमच्या कॅलरीचे सेवन आरामात करू शकता. झोपायच्या वेळेच्या २ तास आधी रात्रीचे जेवण संपवा.
जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर ७ वाजतापर्यंत नियमित जेवण करा आणि झोपायला जा. उशिरा जेवल्यानंतर लगेच झोपायला गेल्याने लोकांचे कधीही वजन कमी होत नाहीत.
एका संशोधनानुसार असे आढळले आहे की इतर कार्बपेक्षा बटाटे जास्त खाल्ल्याने पोट पूर्ण भरले जाते. बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो हा गैरसमज आहे. याउलट, त्यात भरपूर फायबर आणि चांगल्या प्रतीचे कार्ब असतात. आपल्याला फक्त कमी प्रमाणात खाण्याची आवश्यकता आहे.