या गोष्टी वरून आपल्याला समजेल की अंबानी यांच्याकडे किती पैसा आहे….आणि का ते इतका पैसा पाण्यासारखे खर्च करू शकतात

या गोष्टी वरून आपल्याला समजेल की अंबानी यांच्याकडे किती पैसा आहे….आणि का ते इतका पैसा पाण्यासारखे खर्च करू शकतात

आपल्या सर्वांना माहित असेलच की भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना एकूण तीन मुले आहेत, त्यापैकी दोन मुलांनी लग्न झाली आहेत. आपल्याला माहित असेल की काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांनी आपली मुलगी ईशा अंबानीचा विवाह व्यावसायिक आनंद पिरामलशी केला होता.

हे लग्न जगातील सर्वात श्रीमंत विवाहसोहळ्यांमध्ये मोजले जाते आणि लग्नाच्या वेळी मुकेश अंबानी यांनी कोट्यावधी रुपये खर्च केले हे आपण सर्वानी पहिले आहेच. ईशा अंबानी यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी आनंद पीरामलशी लग्न केले आणि आता या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला ईशा अंबानीच्या लग्नाशी संबंधित खास गोष्टी सांगणार आहोत.

असे म्हणतात की मुकेश अंबानी यांनी आपली एकुलती एक मुलगी ईशा अंबानीच्या लग्नात 700 कोटी रुपये खर्च केले. लग्नाच्या दिवशी ईशा अंबानीने जो लेहेंगा घातला होता त्याची किंमतही करोडो होती. असे सांगण्यात येते की तिच्या लग्नाच्या ड्रेसची किंमत साधारणता ९८ लाख रुपये इतकी होती.

ईशा अंबानीच्या लग्नात बॉलिवूड स्टार्सपासून देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्याच्या लग्नाला परदेशी नेतेही आले होते. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे तडकाफडकी लग्न झाले आणि त्याच्या लग्नाची सुरुवात अंबानी याचे घर अँटिलिया पासून झाली होती. अंबानींचे घर अँटिलिया बरेच मोठे आहे आणि हे घर अतिशय सुंदर पद्धतीने तेव्हा सजविण्यात आले होते. घर सजवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले गेले.

ईशा अंबानीचे लग्न रॉयल स्टाईलमध्ये झाले होते आणि लग्नात पाहुण्यांना प्रत्येक प्रकारचे भोजन देण्यात आले होते. एवढेच नाही तर पाहुण्यांना चांदीच्या थाळीत जेवण दिले गेले होते.

अंबानी फॅमिलीच्या आउटफिट्सची ही लग्नात खूप चर्चा होती. लग्नाच्या वेळी अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोट्यवधी रुपयांचे कपडे घातले होते. वधू ईशा अंबानीच्या लग्नामधील सर्वच ड्रेसची किंमत एकूण 90 कोटी होती. असं म्हटलं जातं की ईशाची लग्न जोडा हिऱ्याने भरला होता. तसेच मुकेश अंबानी यांच्या पत्नीच्या कपड्यांवर हिरे लावण्यात आले होते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ईशा अंबानीच्या लग्नाचे कार्डही खूप महाग होते आणि लग्नाचे कार्ड लाखो रुपये किमतीचे होते. इशा अंबानीचे लग्न इटली ते जयपूरपर्यंत साजरे झाले.

जगातील सर्वात महागडी गायिका बियोंसेला बोलवले होते आणि जयपूर येथे मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. बियॉन्सीने लग्नात गाण्यासाठी 15 कोटी रुपये घेतले होते. असे सांगण्यात येते अंबानी यांनी या लग्नात ऐकून १७०० कोटी रुपये खर्च केले होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *