या पाच अभिनेत्री आपल्या आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून गेल्या होत्या घर सोडून…पण यातील ही अभिनेत्री तर अजून सुद्धा आपल्या घरी अजिबात जात नाही

या पाच अभिनेत्री आपल्या आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून गेल्या होत्या घर सोडून…पण यातील ही अभिनेत्री तर अजून सुद्धा आपल्या घरी अजिबात जात नाही

कुटुंब हा प्रत्येकाच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. असे म्हणतात की कुटुंब एकत्र राहिले तर सर्वात मोठा त्रास सहजपणे सोडविला जाऊ शकतो.

परंतु कधी कधी अशी सुद्धा वेळ येते ज्यामुळे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून स्वतःच्या कुटुंबापासून दूर जातात. मात्र, केवळ सामान्य माणसेच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सनीही आपल्या कुटूंबियांचा राग आल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

तरी सामान्य लोकांना असे वाटते की त्यांच्या आयुष्यातच केवळ अडचणी आहेत, परंतु बॉलिवूड सेलेब्सच्या जीवनात देखील अनेक प्रकारच्या अडचणी असतात. होय, अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे आपल्या कुटुंबियांशी चांगले संबंध नाहीत.

तर आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांचे आपल्या कुटूंबाशी चांगले संबंध नव्हते. चला तर मग जाणून घेऊया बॉलीवूड अभिनेत्री रेखा का आपल्या कुटुंबापासून का दूर झाली

रेखा:-

बॉलिवूडची सदाहरित अभिनेत्री रेखाने आपल्या अभिनयाने अनेक लोकांना चांगलीच भुरळ घातली आहे. एक काळ असा होता की रेखा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती, तिचे लाखो चाहते होते आणि तिच्या नावाने अनेक चित्रपट सुपरहिट होत असतं. तसे रेखाचे व्यावसायिक आयुष्य हे सुपरहिटच होते परंतु तिचे वैयक्तिक जीवन बर्‍याच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

असे म्हणतात की रेखाचे तिच्या आई-वडिलांशी असलेले संबंध कधीही चांगले नव्हते. रेखाने स्वतः तिच्या चरित्रामध्ये या वस्तुस्थितीवर लिहले आहे.

खरं तर, रेखाच्या जन्मानंतर तिच्या वडिलांनी तिच्या आईला सोडले आणि काही दिवसांनी आईला जुगार खेळण्याची सवय लागली. अशा परिस्थितीत घरात आर्थिक कोंडी सुरू झाली आणि यामुळे रेखाने अगदी लहान वयातच काम करण्यास सुरवात केली.

सुरवीन चावला:-

टीव्ही इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत प्रवास केलेल्या सुरवीन चावला यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. पण सुरवीनचे नाते आपल्या कुटूंबाशी कधी सुद्धा चांगले नव्हते.

तिच्या पालकांनी सुद्धा आपले सुरवीन चावला हिच्याशी असलेले सर्व संबंध तोडल्याचे सांगितले होते. यामागील कारण असे होते की, सुरवीनच्या आई-वडिलांना तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करावे असे वाटत नव्हते.

मल्लिका शेरावत:-

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावतसुद्धा आपल्या कुटूंबावर नाखूष होती. मीडिया रिपोर्टनुसार मल्लिकाचे आई-वडीलही तिच्या विरोधात होते आणि यामागील कारण म्हणजे मल्लिकाचा चित्रपटांमध्ये होत असलेला प्रवेश.

असे म्हटले जाते की मल्लिकावर तिच्या घरातील सदस्य अत्याचार करायचे आणि म्हणूनच या अभिनेत्रीने तिच्या घरापासून कायमचा निरोप घेतला आणि आपल्या वडिलांचे आडनावही वापरले नाही.

कंगना रनौत:-

बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखल्या जाणार्‍या अभिनेत्री कंगना रनौतचादेखील या यादीमध्ये समावेश आहे. होय, या अभिनेत्रीमध्ये कंगनाचाही समावेश आहे, तिचे सुद्धा तिच्या कुटुंबियांशी संबंध कधी चांगले नव्हते. तिने याबद्दल बर्‍याच वेळा उघडपणे बोलले आहे.

एकदा तिने मुलाखतीत सांगितले होते की एकदा ती घरातून पळून गेली कारण माझे कुटुंब माझ्या चित्रपटात काम करण्याच्या विरोधात होते. मात्र, कंगना रनौतचे तिच्या आई-वडिलांशी असलेले नाते आता बरेच चांगले आहे. आता कंगना आपला बहुतेक वेळ तिच्या पालकांसमवेत घालवते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *