तुम्हालाही बोटे मोडण्याची सवय आहे…पण हीच सवय आपल्याला खूप महागात पडू शकते…होऊ शकतात हे गंभीर परिणाम

तुम्हालाही बोटे मोडण्याची सवय आहे…पण हीच सवय आपल्याला खूप महागात पडू शकते…होऊ शकतात हे गंभीर परिणाम

अनेक लोकांना तुम्ही पाहिले असेल की बोटे मोडण्याची सतत सवय असते. अनेकदा घाबरल्याने अथवा कंटाळा आल्यास बोटे मोडत असल्याचे अनेकांना तुम्ही पाहिले असेल. लहान मुलेही मोठ्यांना असे करताना पाहून स्वत:

करू लागतात. एक दोनदा ठीक आहे मात्र वारंवार तुम्ही असे करत राहिलात तर ती सवय होऊन जाते. त्यामुळे जर एखाद्या दिवशी बोटे मोडली नाहीत तर बोटे जड झाल्यासारखी वाटू लागतात. तुम्हालाही ही सवय आहे का? ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अतिशय वाईट आहे. या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास सतावू शकतो.

या कारणांमुळे बोटे दुखतात:-

शरीरातील प्रत्येक दोन हाडांच्या मध्ये एक लिक्विड असते. ज्यामुळे हाडांची हालचाल होण्यास मदत होते. हे लिक्विड म्हणजे सायनोव्हायल फ्लुईड असते. हे लिक्विड हाडांना एक प्रकारचे ग्रीसिंग करण्याचे काम करते मात्र जेव्हा बोटे मोडली जातात तेव्हा हे लिगामेंट कमी होत जाते आणि हाडे एकमेकांशी रगडू लागतात. यामुळे हाडांमध्ये कार्बन डायऑक्साईड भरण्यास सुरूवात होते तसेच हळू हळू सांध्यांमध्ये त्रास सुरू होते. हेच कारण आर्थरायटिससाठी कारणीभूत ठरू शकते.

वारंवार बोटे मोडल्याने बोटांमध्ये ताण येतो. यामुळे हाडांना जोडणारे लिगामेंटचे सिक्रेशन कमी होऊ लागते. यामुळे हाडे एकमेकांशी रगडू लागतात. याचा परिणाम म्हणजे आर्थरायटिसचे तुम्ही शिकार होऊ शकता.

सतत बोटे मोडल्याने बोटांच्या सांध्यांना सूज येते. वारंवार तुम्ही हे करत असाल तर ही सूज अधिकच वाढते. त्यामुळे बोटांना स्पर्श केल्यासही बोटे दुखू लागतात. पेशींना सूज येते.

बोटे मोडणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकत. डॉक्टरांच्या मते हाताची किंवा पायाची बोटं मोडल्याने आपल्या हाडांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ह्याने त्यांच्यातील कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे ही सवय जेवढ्या लवकर सोडता येईल तेवढे चांगले.

आपली बोटं, गुडघा आणि कोपर ह्यांच्या जॉईन्टमध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं. ज्याला synovial fluid म्हणतात. हे लिक्विड आपल्या हाडांच्या जॉईन्टमध्ये ग्रीस प्रमाणे काम करते.

त्यासोबतच ह्यामुळे आपली हाडे एकमेकांशी घर्षण करत नाहीत. ह्या लिक्विडमध्ये असणारा वायू जसे की कार्बन डाय ऑक्साईड तिथे स्वतःसाठी जागा बनवतो. ज्यामुळे तिथे बबल्स तयार होतात. जेव्हा आपण बोट मोडतो तेव्हा हे बबल्स फुटतात. ह्यामुळेच बोट मोडल्यावर तो कुट-कुट आवाज येतो.

का दुसऱ्यांदा बोट मोडल्यावर आवाज येत नाही. असं का होत असेल?

तर होत असं की, एकदा बोट मोडले की, ते बबल्स फुटून जातात आणि मग त्या लिक्विडमध्ये परत ते बबल्स तयार व्हायला १५-२० मिनिटे लागतात.

त्यामुळे आपण एकदा का बोटे मोडली की त्यानंतर बोटे मोडल्याचा आवाज येत नाही. मग तुम्ही कितीही वेळा ट्राय केलं तरी जोपर्यंत ते बबल्स पुन्हा तयार होत नाही तोपर्यंत आवाज येत नाही.

एका रिपोर्टनुसार आपली हाडे एकमेकांसोबत लिगामेंटच्या सहाय्याने जुळलेली असतात. नेहमी अशा पद्धतीने बोटे मोडत राहिल्याने आपल्या हाडांतील लिक्विड कमी होऊ लागते. जर ते पूर्णपणे संपले तर त्यामुळे संधिवात होऊ शकतो. तसेच जर सांध्यांना नेहमी ओढत राहिलं तर आपली हाडे सैल होऊ शकतात, त्यांची पकड ढिली होऊ शकते.

ह्यासंबंधी कॅलिफोर्निया विश्वविद्यालय तसेच इतर काही ठिकाणी देखील येथे संशोधन सुरु आहे. पण बोट मोडल्याने कुठला आजार होऊ शकतो हे अजूनही सिद्ध झालेले नाही. तरी ह्याच्या परिणाम तुमच्या हातांच्या आणि पायांच्या हाडांवर होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेव्हा ह्यानंतर बोट मोडताना जरा विचार करा…आणि मुख्य म्हणजे तुमचे असे मित्र मैत्रीण ज्यांना ही बोटे मोडण्याची सवय आहे त्यांना हा लेख नक्की शेअर करा.

admin